मुंबई उच्च न्यायालयाचे यशस्वी न्यायदान; ७९ वर्ष जुना खटला निकाली

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच ७ ऑक्टोबर १९४७ रोजी दाखल झालेला एक दिवाणी दावा तब्बल ७९ वर्षांनंतर निकाली काढण्यात आला आहे. न्यायमूर्ती फरहान पी. दुबाश यांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या प्रकरणावर अंतिम मोहोर उमटवली.


हा खटला दिवंगत हाजी अलीमोहम्मद हाजी कासम अगबोटवाला यांच्या मालमत्तेच्या वाटपाशी संबंधित होता. या इस्टेटमध्ये मुंबईतील संपूर्ण दहिसर गावाचा समावेश असून, एकूण क्षेत्रफळ सुमारे २८९१ एकर इतके होते.


मालमत्तेची देखभाल करण्यासाठी न्यायालयाने १९५० मध्ये 'कोर्ट रिसीव्हर'ची नियुक्ती केली. तसेच १९५२ मध्ये न्यायालयाने प्राथमिक हुकूमनामा जारी करून सर्व वारसांचे कायदेशीर वाटे निश्चित केले. गेल्या आठ दशकांत मूळ पक्षकारांचे निधन झाले आणि त्यांचे वारस न्यायालयात लढा देत राहिले. आज या खटल्यात मृताची चौथी पिढी कार्यरत होती.


प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर, चौथ्या पिढीतील सर्व वारसांनी एकत्र येत 'परस्पर संमतीने अटी' (Consent Terms) मान्य केल्या. न्यायालयाने या अटी स्वीकारून हा दावा निकाली काढला. या निकालामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील सर्वात जास्त कालावधीकरिता प्रलंबित असलेल्या प्रकरणांपैकी एकाचा निकाल लागला आहे.

Comments
Add Comment

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे

गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी राज्य सरकारची नियमावली

अत्यावश्यक सेवांना प्राधान्य; साठा मुबलक, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मुंबई : इराण आणि इस्राईल दरम्यान

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांना स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय

१ एप्रिलपासून मर्सिडीज-बेंझच्या कार किमतीत २ टक्क्यांची होणार वाढ

मुंबई : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारातील ग्राहकांसाठी एक

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात