Rajyasabha Election 2026: राज्यसभेसाठी भाजपकडून कोणत्या नावाची चर्चा; 'ही' पाच नावं आली समोर

मुंबई: राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी वाढली आहे. राज्यसभेवर आयारामाना संधी न देता पक्षातील निष्ठावंताना संधी मिळावी, यासाठी भाजपच्या काही निष्ठावंतांचे प्रयत्न सुरु आहेत. मागील काही वर्षात भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवले जाते. पण आता तरी निष्ठावंतांचा विचार व्हायला पाहिजे, असे भाजपच्या एका गटाचे मत आहे. तर भाजपमध्ये काही प्रमुख नावांची राज्यसभेसाठी चर्चा सुरु आहे. विनोद तावडे, रामदास आठवले, विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा असल्याची महिती समोर आली आहे.



राज्यसभेसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार



निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील.



महाराष्ट्रातून निवृत्त होणारे राज्यसभा सदस्य



शरद पवार (श.प. गट)
रामदास आठवले (रिपाई)
फौजिया खान (श.प. गट)
रजनी पाटील (काँग्रेस)
प्रियांका चतुर्वेदी (ठाकरे सेना)
धैर्यशील पाटील (पेण- भाजप)
भागवत कराड (भाजप)



राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक



५ मार्च – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत
६ मार्च – अर्जांची छाननी
९ मार्च – उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख
१६ मार्च – सकाळी ९ ते सायं. ४ मतदान; सायं. ५ नंतर मतमोजणी

Comments
Add Comment

Ahilyanagar Crime : साड्या पाहण्याचा बहाणा केला अन् 14 तोळ्याचे दागिने पळवले

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. साड्या पाहण्याचा बहाणा करत चक्क मैत्रिणीच्याच घरातून 14

Pune Crime : पुण्यात ९ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याची खळबळजनक घटना!

पुणे : कौटुंबिक वादातून चिडलेल्या एका महिलेने स्वतःच्याच ९ महिन्यांच्या निष्पाप पुतण्याच्या तोंडात अत्यंत

Jalgaon : जळगावात अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाचा बडगा, नागरिक समित्यांची स्थापना; २४ तासांत कारवाई बंधनकारक

Jalgaon : जळगाव शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, फ्लेक्स आणि पोस्टर्समुळे शहराचे सौंदर्य बिघडत असून वाहतुकीलाही

Pune Autorickshaw Fare Hike : पुणेकरांना महागाईचा झटका : १ सप्टेंबरपासून ऑटो रिक्षा प्रवास महागणार; RTA कडून नव्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब!

पुणे : पुणे शहर आणि परिसरात ऑटो रिक्षाने दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना आता आपल्या खिशाला जास्तीची कात्री

Jalgaon : 'मिशन ग्रीन जळगाव सिटी’ अंतर्गत 1 लाख वृक्षारोपण, १० ऑगस्टपासून मोहिमेला सुरुवात

Jalgaon : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र मिशन (Green Maharashtra Mission) अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिका

Mumbai Metro : एमएमआरडीए मेट्रोचा नवा विक्रम! ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार; अवघ्या १७९ दिवसांत शेवटचे ५ कोटी प्रवासी

मार्गिका २अ, ७, २ब (टप्पा-१) आणि ९ (टप्पा-१) वर वाढता प्रतिसाद; सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७९ लाखांवर मुंबई :