Mumbai Metro: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी अपडेट समोर; तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना...

मुंबई: मुंबई मेट्रोसंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकरांच्या प्रवासाला गती देणाऱ्या मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते गुंदवली) मार्गिकेला आज तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला आहे. ऐन गर्दीच्या वेळी दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये अचानक बिघाड झाल्याने ही सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या १५ ते २० मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच उभी आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.



नेमकं काय घडलं?



मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ च्या दरम्यान मुंबई मेट्रोच्या दहिसर ते गुंदवली या मार्गावर बिघाड झाला. दहिसरहून गुंदवलीच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे गेल्या १५ मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्थानकातच रखडली आहे. या बिघाडामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (MMMOCL) तातडीने हालचाली सुरू केल्या. गुंदवली स्थानकात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अचानक सेवा ठप्प झाल्याने स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या बिघाडामुळे संपूर्ण वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात