Nacha Danana Marathi Song : ‘नाचा दणाना’वर थिरकणार संपूर्ण महाराष्ट्र!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच व्हायरल होत आहे. हळदीचे हे गाणे धमाल संगीत, भव्य सजावट आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे पाहाताक्षणीच थिरकायला भाग पडणारे आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष उठून दिसत आहे तर त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या जबरदस्त कलाकारांचा जल्लोष अधिकच रंगत आणत आहे. समीर आशा पाटील, यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने या गाण्यात अफलातून एनर्जी आणली आहे.



कौटुंबिक महासोहळा अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याने ‘नाचा दणाना’मध्ये संपूर्ण कुटुंबाचा जल्लोष पाहायला मिळतोय. गाण्यात घरातील प्रत्येक सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसतो. कुटुंबातील बॅाण्डिंग, एकमेकांवरील प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्साह या गाण्यातून सुंदरपणे उलगडतो. त्यामुळेच चित्रपटाच्या नावाप्रमाणे हे गाणेही ‘सुपर डुपर’ हिट ठरण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक कलाकाराची ऊर्जा, नृत्य आणि रंगतदार वेशभूषा यामुळे हे गाणे अधिकच आकर्षक बनले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील हुक स्टेप इतकी भन्नाट आहे की, ती लवकरच ट्रेंडिंग होणार, याची चाहत्यांना खात्री आहे. लग्नसमारंभात ‘नाचा दणाना’वर नाचल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होणार नाही, असे चित्र सध्या हे गाणे पाहून दिसतेय.


चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, ‘’ ‘नाचा दणाना’ हे गाणे चित्रपटातील एक खास क्षण साजरा करते. नात्यांमधला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची भावना या गाण्यातून अधोरेखित होते. कथा ज्या उंचीवर पोहोचते, त्या क्षणाला साजेशी ऊर्जा आम्ही या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.” झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित 'सुपर डुपर‘चा हा कौटुंबिक महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी रंगणार आहे. या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

Comments
Add Comment

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क

Fishermen Diesel Subsidy : राज्यातील मच्छिमारांना किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून द्या!

- खासदार नारायण राणे यांच्यासह मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी घेतली केंद्रीय पेट्रोलियम

Ashish Shelar : गडकिल्ले, ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला गती; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील गडकिल्ले, प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक स्मारकांच्या संवर्धनाला अधिक गती देण्यासाठी जिल्हा