उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट ...आणि नंदनवनमध्ये फुलल्या कलाप्रेमींच्या गप्पा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्याने आज एका वेगळ्या भेटीचा अनुभव घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांच्यातील कलारसिक उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनुभवला. नंदनवन बंगल्यात लावलेली मुंबईतील हेरिटेज वास्तुंची जुनी छायाचित्रे बारकाईने न्याहळत श्री. ठाकरे यांनी त्यातील आठवणी सांगितल्या त्याचबरोबर बंगल्याचा ऐतिहासिक वारसा उत्तम कलाकृतींनी जपल्याबद्दल त्यांनी श्री. शिंदे यांचे अभिनंदनही केले.


'नंदनवन' ही इमारत एक ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे. या इमारतीमध्ये जतन करण्यात आलेली दुर्मिळ आणि जुनी छायाचित्रे पाहून श्री. ठाकरे भारावून गेले. ही छायाचित्रे बारकाईने पाहताना त्या वास्तुंबद्दलची आठवण देखील त्यांनी सांगितली. हेरिटेज इमारतींसारख्या बांधकामांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यातून शहराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी मी मुख्यमंत्री असताना धोरण केले होते अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी श्री. ठाकरे यांना दिली.


नंदनवन इमारतीचा हेरीटेज लूक जपतानाच परिसरात देखील त्याचपद्धतीने बांधकाम केले असून या इमारतीच्या परिसराची देखील राज ठाकरे यांनी आवर्जून पाहणी केली. श्री.ठाकरे स्वतः एक उत्तम व्यंगचित्रकार आणि कलेचे चोखंदळ चाहते आहेत. राजकीय धावपळीतही या नेत्याने आपल्यातील कलाकाराला जिवंत ठेवत, ऐतिहासिक ठेव्याचे केलेले कौतुक लक्ष वेधून घेणारे ठरले.

Comments
Add Comment

Mumbai BJP President MLA Amit Satam : बीएमसीकडून सर्व आरोग्यविषयक खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाणार – मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

बीएमसी रुग्णालयांमधील उपलब्ध खाटांची रिअल-टाइम माहिती दर्शविण्यासाठी ऑनलाइन डॅशबोर्ड विकसित केला जाणार;

Middle East War : युद्धविरामाच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची घसरण

मुंबई : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय

Pod Taxi : लवकरच मुंबईत धावणार भारतातील पहिली 'पॉड टॅक्सी'

मुंबई : मुंबई शहरं हे कधीच विश्रांती घेत नाही इथे २४ तास सतत वर्दळ पाहायला मिळते असते. मुंबईत लोकांची गर्दी

Bmc News : मुंबईत ई-कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारा

महापालिकेत ठरावाच्या सूचनेद्वारे झाली मागणी मुंबई : शहरात झपाट्याने वाढणाऱ्या ई-कचऱ्याच्या समस्येवर तोडगा

Ashwini Bhide : रस्ते सिमेंटीकरण कामांना कोणतीही मुदतवाढ नाही

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या

BMC News : मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डयांच्या दुरुस्ती खर्चात ७५ टक्के घट

तब्बल २०२ कोटींवरुन खर्च आता अंदाजे ४४ कोटींवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या