राष्ट्रपतींनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी

नवी दिल्‍ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूची पाहणी केली. ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू, २०२६’ मध्ये ७० हून अधिक देशांची नौदले सहभागी झाली आहेत.


यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू हा सागरी परंपरांबद्दल विविध राष्ट्रांमधील एकता, विश्वास आणि आदर प्रतिबिंबित करतो. वेगवेगळे ध्वज असलेली जहाजे आणि विविध देशांचे खलाशी एकतेची भावना प्रदर्शित करतात. एकजुटीची ही भावना, 'युनायटेड थ्रू ओशन्स' या पुनरावलोकनाच्या संकल्पनेत मांडण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या सामूहिक नौदल सामर्थ्याची वचनबद्धता आणि निर्धार सर्व आव्हानांवर मात करू शकतो, हा जागतिक समुदायासाठी एक सकारात्मक संदेश आहे, असे त्या म्हणाल्या.


सागरी क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय संबंधांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'जग एक कुटुंब आहे' या मूल्यांवर आधारित आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. हा दृष्टीकोन असा व्यावहारिक विचार मांडतो की, भागीदारीतून जागतिक सुरक्षा आणि विकास, शाश्वतता आणि स्थैर्य निर्माण होते. भागीदारीची ही भावना शाश्वत जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. भारताचा असा विश्वास आहे की एक मजबूत सागरी व्यवस्था, ही सामूहिक जबाबदारी आणि समविचारी भागीदारांमधील सहकार्यात्मक कृतीवर आधारित आहे. त्या म्हणाल्या की, हा फ्लीट रिव्ह्यू भारताच्या ‘महासागर’ हा दृष्टीकोन देखील पुढे नेत आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, हा आहे, असे त्या म्हणाल्या.


राष्ट्रपतींनी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी नौदलातील अधिकारी आणि खलाशांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की हे जवान त्यांची सेवा आणि त्यांच्या राष्ट्रांच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची शिस्त, समर्पण आणि क्षमता हा सामूहिक सागरी सुरक्षेचा पाया आहे. फ्लीट रिव्ह्यूमधील त्यांच्या उपस्थितीमुळे आपले विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत आणि महासागरातील शांतता, स्थैर्य आणि सहकार्याप्रति आपली सामायिक वचनबद्धता पुन्हा सिद्ध झाली आहे, असे त्या म्हणाल्या.


या फ्लीट रिव्ह्यूमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी सर्व नौदले एकत्रितपणे जागतिक समुदायाचा विकास, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाला चालना देणारा घटक म्हणून महासागरांची भरभराट करण्यात सहाय्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी