मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांची पॅरापेट कोसळल्याच्या घटनेनंतर मेट्रो लाईन ४ साठी थर्ड पार्टी ऑडिटची मागणी

एमएमआरडीए आणि टी-वार्ड अधिकाऱ्यांसह एलबीएस रोड पट्ट्यावर आमदार मिहिर कोटेचा यांची संयुक्त पाहणी


पॅरापेट भिंतीतील अलाईनमेंट व फिनिशिंगमधील त्रुटींवर नागरिकांच्या सुमारे ५०० तक्रारी


त्रुटींसाठी जबाबदार कन्सल्टंट आणि ऑडिटर्स कडक कारवाई करावी – आमदार मिहिर कोटेचा


मुंबई : शनिवारी झालेल्या पॅरापेट कोसळल्याच्या घटनेनंतर मेट्रो लाईन ४ च्या संरचनेच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीती वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी बुधवारी एलबीएस रोडवरील मेट्रो लाईन ४ च्या पट्ट्याची संयुक्त पाहणी केली. या पाहणीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या टी-वार्डमधील अधिकारी उपस्थित होते.


संयुक्त पाहणीनंतर आमदार मिहिर कोटेचा यांनी संपूर्ण मेट्रो लाईन ४ मार्गिकेचे थर्ड पार्टी गुणवत्ता नियंत्रण व सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली. संरचनेची सुरक्षितता अबाधित असली तरी त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या कन्सल्टंट आणि ऑडिटर्स यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी केली.


बुधवारी करण्यात आलेल्या या संयुक्त पाहणीत मुलुंडमधील एलबीएस रोडवरील मेट्रो लाईन ४ च्या सात ते आठ ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. मधुकर खरात यांच्या नेतृत्वाखालील पथक, टी-वार्ड अधिकारी योगिता कोळे व आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नगरसेविका डॉ. हेतल गाला मोरवेकर आणि दीपिका घाग उपस्थित होत्या.


शनिवारी झालेल्या पॅरापेट कोसळण्याच्या घटनेनंतर रहिवाशांकडून मेट्रो मार्गिकेवरील पॅरापेट भिंतींमध्ये अलाईनमेंटच्या समस्या, गॅप्स आणि लेव्हलमधील फरक दर्शविणारे फोटो पाठवले जात आहेत. सुमारे ५०० सारखे फोटो मला आणि टी-वार्ड आपत्ती व्यवस्थापन पथकाला नागरिकांनी पाठवले आहेत, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.


अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी किरकोळ तांत्रिक व फिनिशिंगमधील त्रुटी, विशेषतः पॅरापेट भिंतींच्या अलाईनमेंट संदर्भात, मान्य केल्या असल्याचे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले. मात्र, या त्रुटींमुळे संरचनेच्या सुरक्षिततेवर किंवा स्थैर्यावर कोणताही परिणाम झालेला नसून संरचना १०० टक्के सुरक्षित असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केल्याचे आमदार मिहिर कोटेचा यांनी नमूद केले.


मात्र, काही ठिकाणी आठ ते बारा महिन्यांपूर्वी बसवण्यात आलेल्या या संरचनेतील त्रुटी सल्लागार आणि ऑडिटर्सना त्यावेळी किंवा त्यानंतर का आढळल्या नाहीत? कास्टिंगनंतर त्यांनी या त्रुटींची दखल का घेतली नाही? असा सवाल आमदार मिहिर कोटेचा यांनी केला.


आमदार मिहिर कोटेचा पुढे म्हणाले की, मुंबई हे जागतिक शहर असून जगातील विकसित शहरांमधील मेट्रोची गुणवत्ता उच्च दर्जाची असते. महाराष्ट्र शासनाने करारानुसार कंत्राटदारांना पूर्ण देयके अदा केली आहेत. त्यामुळे संपूर्ण मेट्रो लाईन ४ मार्गिकेचे थर्ड पार्टी गुणवत्ता नियंत्रण व सुरक्षा ऑडिट करणे आवश्यक आहे. संरचनेची सुरक्षितता अबाधित असली तरी त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या कन्सल्टंट आणि ऑडिटर्स यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आमदार मिहिर कोटेचा यांनी केली.


तसेच, ओळखण्यात आलेल्या ठिकाणांचे जीआयएस टॅगिंग करून छायाचित्रांसह सविस्तर तांत्रिक अहवाल प्रसिद्ध करण्याची मागणीही आमदार मिहिर कोटेचा यांनी एमएमआरडीएकडे केली. यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी होण्यास मदत होईल, असे आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कन्नमवार नाल्याची भिंत उभारण्याचा मार्ग मोकळा, ३९ बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : विक्रोळी येथील कन्नमवार नगर नाला बाधित करणाऱ्या ४३ बांधकामांपैकी ३९ बांधकामांचे

मुंबईत भव्य प्रवेशव्दार व क्लॅाकटॅावर उभारा, महापौर रितू तावडे यांनी आयुक्तांना सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईला दररोज लाखो पर्यटक भेट देत असतात. मुंबईत

अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप VIRALकरणाऱ्यांवर कडक कारवाई करणार - सुनिल तटकरे

मुंबई :  काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी अजित पवरांच्या आवाजात खोटी, दिशाभूल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट ...आणि नंदनवनमध्ये फुलल्या कलाप्रेमींच्या गप्पा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या 'नंदनवन' बंगल्याने आज एका वेगळ्या

मुंबई-मार्सेलिस दरम्यान उभारणार नवा आर्थिक 'सेतू' - महाराष्ट्र आणि फ्रान्सच्या 'पाका' प्रांतात सामंजस्य करार

वीर सावरकरांच्या स्मृतींनी पावन झालेल्या भूमीशी जोडले जाणार नाते मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या

मुंढवा जमीन गैरव्यवहाराचा अहवाल अद्याप सीलबंद - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; अहवाल वाचल्यानंतर दोषींविरोधात कठोर पावले उचलणार

मुंबई : पुणे येथील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे चौकशी समितीचा अहवाल अद्याप सीलबंद असून त्याचे वाचन