Nitesh Rane : ठाण्यातील 'मालवणी महोत्सवा'त मंत्री नितेश राणे यांची हजेरी; स्टॉलला भेट देऊन ग्राहकांशी साधला संवाद

ठाणे : ठाणे शहरात सध्या मोठ्या उत्साहात सुरू असलेल्या 'मालवणी महोत्सवा'ला मंत्री नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावून महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सीताराम राणे यांचीही उपस्थिती होती. या भेटीदरम्यान नितेश राणे यांनी केवळ हजेरीच लावली नाही, तर संपूर्ण महोत्सवात फिरून कोकणी कला आणि खाद्यसंस्कृतीची पाहणी केली.





मंत्री नितेश राणे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या ग्राहकांशी आणि विक्रेत्यांशी आपुलकीने चर्चा केली. कोकणी उत्पादने, मालवणी मसाले आणि खाद्यपदार्थांची त्यांनी आवर्जून माहिती घेतली. नितेश राणे आणि सीताराम राणे यांचे महोत्सवाच्या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी महोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. महोत्सवाच्या मुख्य स्टेजवर नितेश राणे यांचे आयोजन समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी संयोजकांनी त्यांचे आभार मानले आणि महोत्सवाचा गौरव वाढवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नितेश राणे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद साधताना मालवणी संस्कृती आणि परंपरा जपण्याचे आवाहन केले. ठाणेकरांनी या महोत्सवाला दिलेला प्रतिसाद पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.



या महोत्सवात मालवणी खाद्यपदार्थ, कोकणातील हस्तकला आणि पारंपारिक वस्तूंनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. मंत्री नितेश राणे यांच्या भेटीमुळे महोत्सवात एक वेगळाच उत्साह संचारला होता, तसेच नागरिकांनी त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Comments
Add Comment

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान

- युद्ध नको, बुद्ध हवा; ठाण्यात आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला समतेचा

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Iran Attack on Kuwait : इराणचा कुवैतमधील मंत्रालयाच्या इमारतींवर हल्ले

इराणने रविवारी (५ एप्रिल) कुवैतमधील अनेक इमारतींना लक्ष्य केले. कुवैतच्या वित्त मंत्रालयाने सांगितले की, तेल

Himachal Pradesh Avalanche : अटल बोगद्याजवळ हिमस्खलन; सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही

हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळ असलेल्या अटल टनल रोहतांगच्या टोकाजवळ हिमखंड कोसळल्याची घटना घडली आहे. दोन