• २,५०० कोटी रु. पेक्षा अधिक दीर्घकालीन गुंतवणुकीसह फेडएक्स एनएमआयए येथे एक ३००,००० चौ. फुटात विस्तारलेला संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हब विकसित करणार
• ही सुविधा भारताला दक्षिण-पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेला जोडणारा एक स्थानिक हब म्हणून कार्य करेल
• पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी हा हब एनएमआयएच्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल
नवी मुंबई : फेडएक्स आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयए) यांनी फेडएक्सच्या संपूर्ण स्वयंचलित एअर कार्गो हबच्या उभरणीचा शुभारंभ केला. हा उपक्रम भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉरमधील क्षमता वाढवेल तसेच पश्चिम भारतासाठी एकात्मिक लॉजिस्टिक्स आणि व्यापार प्रवेशद्वार म्हणून त्यांची भूमिका मजबूत करेल.
फेडएक्सद्वारा करण्यात आलेली २,५०० कोटी रु. ची दीर्घकालीन गुंतवणूक प्रस्तावित ३००,००० चौ. फुट सुविधेस साहाय्य करेल. ही सुविधा प्रादेशिक एकीकरण आणि पुनर्वितरण केंद्र म्हणून डिझाईन करण्यात आली असून अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लि. (एएएचएल) यांच्या भागीदारीत विकसित करण्यात येत आहे. हा हब पश्चिम भारताचा आंतरराष्ट्रीय ट्रेड कॉरिडॉर सशक्त करण्यासाठी एनएमआयए च्या मल्टी-मोडल इन्फ्रास्ट्रक्चरचा उपयोग करेल. हा हब जेव्हा कार्यरत होईल, तेव्हा लॉजिस्टिक्स, वेअरहाऊसिंग, वाहतूक आणि संबंधित सेवाक्षेत्रात ६,००० पेक्षा जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण करेल असे अनुमान आहे.
प्रस्तुत समारंभ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, फेडएक्सचे अध्यक्ष आणि सीईओ राज सुब्रमण्यम, फेडएक्सचे सीओओ, इंटरनॅशनल आणि सीईओ, एअरलाइन- रिचर्ड स्मिथ, फेडएक्स मध्य पूर्व, भारतीय उपखंड आणि आफ्रिका (एमइआयएसए)चे अध्यक्ष कामी विश्वनाथन आणि एएएचएलचे संचालक जीत अदाणी यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
एएएचएलचे संचालक जीत अदाणी म्हणाले, “भारताची व्यापाराची स्पर्धात्मकता मजबूत करणारे एकात्मिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याची एनएमआयए ची दीर्घदृष्टी या घडामोडीतून दिसून येते. जवाहरलाल नेहरू बंदर, औद्योगिक कॉरिडॉर आणि मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट नेटवर्क जवळ असल्यामुळे एनएमआयए उच्च-विकासाच्या निर्यात क्षेत्रांना पाठबळ देण्यासाठी मोक्याच्या स्थानी आहे आणि जागतिक लॉजिस्टिक्सचे प्रवेशद्वार म्हणून महाराष्ट्राची भूमिका अधिक सशक्त करते.”
*फेडएक्स एमईआयएसएच्या अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाल्या, “जागतिक व्यापारातील भारताची स्पर्धात्मकता भारताच्या लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरची विश्वासार्हता आणि गती यांच्यावर दिवसेंदिवस अधिक विसंबून असणार आहे. एनएमआयए येथे हा हब उभरल्यामुळे आम्ही जागतिक नेटवर्कची ताकद आणि भारताच्या सर्वात जलद विकसित होणाऱ्या ट्रेड कॉरिडॉरची सांगड घालू शकू आणि ग्राहकांना दृढ खात्री, वेग आणि कार्यक्षमता प्रदान करू शकू.”
हा उपक्रम दक्षिणपूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेतील व्यापार प्रवाहाला पाठबळ मिळेल आणि जागतिक नेटवर्क कनेक्टिव्हिटी थेट भारताच्या प्रमुख ट्रेड कॉरिडॉरमध्ये समाविष्ट होईल. प्रगत ऑटोमेटेड सॉर्टिंग सिस्टम्स, डायमेन्शनल स्कॅनिंग, हाय-स्पीड स्क्रीनिंग टेक्नॉलॉजी आणि खास एअरक्राफ्ट पार्किंग बेज यांनी सुसज्ज असलेले हे केंद्र एकाच वेळी इनबाउंड आणि आउटबाउंड शिपमेंट्सवर प्रक्रिया करू शकेल, रूटिंगची लवचिकता वाढवेल आणि वाहतुकीच्या वेळेचे बऱ्यापैकी अनुमान करू शकेल. या क्षमतांचा लाभ खास करून इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनियरिंगचे सामान, फार्मास्यूटीकल्स आणि पेरिशेबल (नष्ट होणाऱ्या) वस्तूंसारख्या उच्च मूल्याच्या आणि जेथे वेळ मोलाचा असतो अशा क्षेत्रांना मिळेल. सुधारित विश्वसनीयतेमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) आयात-निर्यात क्षमतांना देखील बळ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याच वेळी, लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल आणि टर्न-अराऊंड टाइमही कमी होईल.
एनएमआयएचे कार्गो इन्फ्रास्ट्रक्चर वार्षिक सुमारे ०.५ मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) इतक्या प्रारंभिक हॅंडलिंग क्षमतेसह सुरू करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्यात वाढ करून अंतिम विकासाच्या टप्प्यात ३.२५ एमएमटीपर्यंत ही क्षमता नेण्यात येईल. मोजून मापून केलेला हा क्षमता-विस्तार मुंबई महानगर क्षेत्राला (एमएमआर) भारतातील एक अत्यंत प्रगत एअर फ्रेट आणि लॉजिस्टिक्स प्रवेशद्वार म्हणून स्थापित करण्याच्या विमानतळाच्या दीर्घकालीन धोरणाला पाठबळ देतो. भारतातील सुमारे तीन दशकाच्या संचालन अनुभवावर आधारित, हा हब फेडएक्सच्या समर्पित उपस्थितीचा विस्तार करतो आणि जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये एक इंटिग्रेटेड एव्हीएशन आणि मल्टीमोडल ट्रेड फ्लॅटफॉर्म म्हणून एनएमआयएच्या भूमिकेला पाठबळ देतो.