मुंबईतील कमर्शियल झोपड्यांकडून ७० टक्के मालमत्ता कराची वसूली

मुंबई: मुंबईतील पात्र झोपड्या महापालिकेच्या मालमत्ता कराच्या कक्षेत येत नसल्या तरी अनेक झोपड्यांच्या जागांचा कमर्शियल वापर केला जात आहे. त्यामुळे निवासी वगळता कमर्शियल वापराच्या झोपड्यांना मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेत महापालिकेच्यावतीने मालमत्ता कराची आकारणी केली जाते. आता १० हजार ७७० मालमत्तांना कराची आकारणी करण्यासाठी नोटीस बजावली असून यासर्वांकडून आतापर्यंत ३२ कोटी ०३ लाख रुपयांच्या मालमत्ता कराची वसूली करण्यात आली आहे.


मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली असून सध्या झोपडपट्टयांमध्ये कोणत्याही प्रकाराचा मालमत्ता कर आकारला जात नाही. या झोपडपट्टयांना ठोकपणे मालमत्ता कराची आकारणी केली जावी अशी मागणी होत असली तरी प्रत्यक्षात ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी असल्याने झोपड्यांना याची आकारणी केली जात नाही. परंतु अनेक झोपड्यांमध्ये निवासी ऐवजी कमर्शियल वापर मोठ्याप्रमाणात होत असून अशाप्रकारे कमर्शियल वापर होत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर आकारणी केली जावी अशाप्रकारचा निर्णय महापलिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासन भूषण गगराणी यांनी कमर्शियल झोपड्या या मालमत्ता कराच्या कक्षेत आणल्या जाव्यात अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे.


मात्र, आतापर्यंत महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कमर्शियल झोपड्यांचा सर्वे करण्यात आला. त्यानुसार सर्वप्रथम ७३६४ कमर्शियल झोपड्यांवर २७ कोटी ०६ आणि त्यावरील दंड ४ कोटी ७१ लाख रुपये अशाप्रकारे एकूण ३१ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांचा मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर १ मार्च २०२५ पासून त्यात २६७५ कमर्शियल झोपड्यांचा समावेश करण्यात आला. या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कमर्शियल झोपड्यांचा २० कोटी १३ लाख रुपयेे आणि त्यावरी दीड लाख रुपयांचा दंड अशाप्रकारे २१ कोटी ६६ लाख रुपयांच्या मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली आहे.


त्यामुळे एकूण १० हजार ७७० कमर्शियल झोपड्यांसाठी आकारल्या जाणाऱ्या मालमत्ता कराची आकारणी ही ५३ कोटी ४३ लाख रुपयांची होती. त्यातील आतापर्यंत ३२ कोटी रुपये आणि त्यावरील दंड २ लाख ७८ हजार रुपये अशाप्रकारे एकूण ३२ कोटी ०३ लाख रुपयांचा मालमत्ता कराची रक्कम करनिर्धारण व संकलन विभागाच्यावतीने वसूल करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे वांद्रे बेहरामपाडा, गरीब नगर, खेरवाडी तसेच धारावी, चेंबूर चिता कॅम्प,दहिसर गणपत पाटील नगर, शिवाजी नगर बैंगनवाडी, गोवंडी, कुर्ला आदी झोपडपट्टयांमध्ये मोठ्याप्रमाणात निवासी बरोबरच कमर्शियल वापर केला जातो. त्यामुळे सरसकट सर्वच झोपड्यांना आणि त्यावरील सर्वच झोपड्यांमधील माळ्या माळ्यांवर असलेल्या कमर्शियल वापराकरता हा कर आकारणी केली जात आहे.


महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विश्वास शंकरवार आणि सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी नियमित मालमत्ता कराची वसूल करतानाच कमर्शियल झोपड्यांकडूनही आतापर्यत ७० टक्के कराची रक्कम वसूल केली आहे.


 

मुंबईतील एकूण कर आकारल्या जाणाऱ्या कमर्शियल झोपड्या: १०,७७०

 

एकूण मालमत्ता कराची आकारणी : ५३ कोटी ४३ लाख रुपये

 

वसूल करण्यात आलेल्या मालमत्ता कराची आकारणी : ३२ कोटी ०३ लाख रुपये
Comments
Add Comment

मागाठाणे–गोरेगाव १२० फूट डी.पी. रोड प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन

मुंबई : लोखंडवाला–मागाठाणे १२० फूट डी.पी. रोड या प्रकल्पाचे भूमिपूजन रविवार १२ एप्रिल रोजी कांदिवली पूर्व येथील

Raj Thackeray : 'आशाताई' -दि लास्ट एम्परर असं म्हणत राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Census : जनगणना २०२६ च्या कार्यक्रमाची जबाबदारी अभियंत्यांच्या खांद्यावर?

अत्यावश्यक कामे पुरी करायची की जनगणना?, अभियंत्यांकडून केला जात आहे सवाल मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी भारतीय

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Railway : ओव्हरहेड वायर तुटली, पश्चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली

मुंबई : रेल्वे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेते. पण आज (रविवार १२ एप्रिल २०२६) सकाळीच

Stray Dogs Sterilized : मुंबईत वर्षाला करणार सुमारे ४५ हजार भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण

- पुढील तीन वर्षांसाठी संस्थांची नेमणूक मुंबई (सचिन धानजी) मुंबईतील वाढत्या भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात