जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा


मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन देशांतील मैत्री आता नव्या उंचीवर पोहोचली असून, दोन्ही देशांनी ती ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’च्या स्तरावर नेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे आयोजित ‘इंडिया-फ्रान्स इनोवेशन फोरम-२०२६’च्या उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली. या कार्यक्रमाला फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची प्रमुख उपस्थिती होती.


या सोहळ्यात दोन्ही नेत्यांच्या हस्ते २०२६ हे वर्ष ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’ (इनोव्हेशन इयर) म्हणून घोषित करण्यात आले. भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्री केवळ धोरणात्मक करारांपुरती मर्यादित नसून ती परस्पर विश्वास आणि सामायिक मूल्यांवर आधारलेली आहे. याच विश्वासाच्या जोरावर दोन्ही देश आता आपल्या संबंधांना ‘विशेष जागतिक धोरणात्मक भागीदारी’च्या स्तरावर नेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.


स्टार्टअप क्षेत्रात भारताची मोठी झेप


भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दशकभरात भारताने स्टार्टअप क्षेत्रात जागतिक स्तरावर तिसरे स्थान मिळवले आहे. २०१४ मध्ये देशात केवळ चार ‘युनिकॉर्न’ कंपन्या होत्या; आज ही संख्या १२० च्या पुढे गेली आहे. गणित, वैद्यकशास्त्र आणि धातूशास्त्राचा समृद्ध वारसा लाभलेल्या भारतातील तरुण पिढीने २१व्या शतकात ‘ग्लोबल गुड’साठी नवोन्मेषाचा ध्यास घेतल्याचे त्यांनी सांगितले.

मॅक्रॉन यांच्याकडून भारताच्या क्षमतेचे कौतुक


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी नवोन्मेष अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. शिक्षण आणि प्रशिक्षणातील गुंतवणुकीवरच नवोन्मेषाचा पाया उभा राहतो, असे ते म्हणाले. भारत आणि फ्रान्सची सामूहिक सर्जनशीलता भविष्यातील जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी सक्षम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Plastic Waste : भारतापुढे दररोज १९ हजार टन प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान

नवी दिल्ली : दुधाची पाकिटे, चिप्सची वेष्टणे आणि ऑनलाइन खरेदीचे पॅकेजिंग यामुळे देशात दररोज सुमारे १९ हजार टन

UP Crime News : प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला अन् प्रियकराने मित्रांसोबत मिळून रचला भयानक खेळ; उत्तर प्रदेश हादरले!

उत्तर प्रदेश : विश्वासाला काळिमा फासणारी आणि मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर

Robot Waiter Murthal : मुरथलच्या धाब्यावर रोबोट वेटरची एन्ट्री! हरियाणातील 'रेशम धाब्या'चा भन्नाट प्रयोग, व्हिडिओ व्हायरल

मुरथल : हरियाणातील मुरथल हे ठिकाण आपल्या चविष्ट आणि गरमागरम पराठ्यांसाठी तसेच पारंपरिक चवीसाठी देशभरात