Nashik: नाशिक-कळवण मार्गावर दोन कारची धडक; सात जण गंभीर जखमी

नाशिक: सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीगडाकडे जाणाऱ्या भाविकांच्या कारला नाशिक-कळवण मार्गावर भीषण अपघाताचा सामना करावा लागला आहे. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांतील ६ ते ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.


हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाड्यांमध्ये अडकलेल्या जखमींना नागरिकांनी मोठ्या शर्थीने बाहेर काढले.


जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेने जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भररस्त्यात दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने नाशिक-कळवण मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.


सध्या वणीगडावर भाविकांची मोठी गर्दी होत असून, घाटातील आणि महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. अशा वेळी वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि वळणांवर सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न

येत्या तीन महिन्यांत 'पीएनजी' साठी अर्ज न केल्यास 'एलपीजी' सिलिंडर बंद

मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा; व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस पुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ मुंबई : राज्यातील

शेतकरी केवळ ‘उत्पादक’ नव्हे तर यशस्वी ‘उद्योजक’ व्हावा पणन मंत्री जयकुमार रावल

वाढवणजवळ उभारणार जगातील सर्वोत्तम बाजार व्यवस्था मुंबई : बदलत्या परिस्थितीत शेतकरी हा केवळ उत्पादक राहून

Pandharpur News : पंढरपुरात पोलिसांची मोठी कारवाई; ५ लाखांच्या कारसह ४ किलो गांजा जप्त

पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती