कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर

- तक्रारदार प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्याने सुनावणी लांबणीवर


मुंबई : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी अडचणीत आलेले कॉमेडियन कुणाल कामरा आणि 'उबाठा' गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे मंगळवारी विधिमंडळाच्या हक्कभंग समितीसमोर हजर झाले. मात्र, या प्रकरणातील तक्रारदार भाजप आमदार प्रवीण दरेकर हे स्वतः उपस्थित राहू शकल्याने सुनावणी होऊ शकली नाही. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार आहे.


गेल्या वर्षी कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विडंबन करणारे एक गीत गायले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सुषमा अंधारे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता. या विडंबनामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. या कृत्यामुळे विधिमंडळाचा अवमान झाल्याचा दावा करत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरोधात हक्कभंगाची सूचना मांडली होती.


या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या हक्कभंग समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे विधिमंडळात आले होते. वर्षभरानंतर या प्रकरणाला गती मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, प्रवीण दरेकर अनुपस्थित राहिल्याने समितीने पुढील तारीख निश्चित केली आहे.


संविधानाचा आदर करतो - कुणाल कामरा


समितीसमोर हजेरी लावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कुणाल कामरा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "मी संविधानाचा आदर करतो आणि संविधान मानतो. त्यामुळे समितीसमोर होणाऱ्या पुढील सुनावणीत मी माझी बाजू नक्कीच मांडेल," असे कामरा यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान, १० मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीत हक्कभंग समिती काय भूमिका घेते आणि कामरा व अंधारे काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

उपनगरांचा 'वेग' वाढणार!

 'मेट्रो ९' आणि '२-बी'चे लोकार्पण; ठाणे-बोरिवली अंतर आता काही मिनिटांवर मुंबई : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा

लघु उद्योगांना भूखंड शुल्कात २० टक्के सवलत

'एमएसएमई' क्लस्टरला बळ; जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय मुंबई : आखाती देशातील

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे

नागपूरकरांवर पाणीसंकट; सलग २ दिवस या भागात राहणार पाणी पुरवठा बंद

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागपूर : नागपूर शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.