हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'विशेष टपाल तिकीट' जारी करा

माजी खासदार राहुल शेवाळे यांची केंद्र सरकारकडे मागणी


मुंबई: वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, 'विशेष टपाल तिकीट' जारी करण्याची मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना शेवाळे यांनी दिलेल्या लेखी निवेदनाबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे.


आपल्या निवेदनात शेवाळे यांनी हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सामाजिक आणि राजकीय योगदानाचा उल्लेख केला आहे. १९६० च्या दशकापासून पुढची ५० वर्षे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय पटलावर महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक हिंदुत्ववादी लोकनेता, महान व्यंगचित्रकार, श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा वक्ता अशा विविध रूपांत बाळासाहेबांनी नेहमीच आपली भूमिका परखडपणे मांडली. त्यांची लेखणी, त्यांची भाषणे आणि त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी सामान्य माणसाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग जागविले, असेही शेवाळे यांनी निवेदनात लिहिले आहे.


नुकतीच, २७ जानेवारी रोजी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची १०० वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वंदनीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा, अशी मागणी शेवाळे यांनी निवेदनातून केली आहे.



काय म्हणाले राहुल शेवाळे ?


"माझ्यासारख्या लाखो शिवसैनिकांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे एक स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या परखड हिंदुत्ववादी विचारांनी देशभरातील सामान्य माणसाला आत्मविश्वास दिला. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विशेष टपाल तिकीट जारी करून शिवसेनाप्रमुखांना अनोखी आदरांजली द्यावी, अशी मागणी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली आहे. याबाबत केंद्र सरकार सकारात्मक असून लवकरच भारतीय टपाल विभागाकडून अशा प्रकारचे विशेष टपाल तिकीट जारी केले जाईल, याची मला खात्री आहे."

Comments
Add Comment

दादरकरांनी, अतिक्रमणमुक्त पदपथ आणि स्वच्छतेबाबत प्रशासनाचे केले कौतुक

महापालिका अतिरिक्त आयुक्तांना पत्र पाठवून व्यक्त केले समाधान मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील काही प्रमुख

महापालिकेवर येत्या बुधवारी १० स्वीकृत नगरसेवकांची होणार नियुक्ती

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच वरून वाढवून दहा करण्याचा निर्णय

भारत-यूरोपियन यूनियन मुक्त व्यापार कराराला फ्रान्सचा पाठिंबा

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन; तंत्रज्ञान, संरक्षण व व्यापार सहकार्यात समान सूत्र मुंबई : "भारत-फ्रान्स

जगातील दोन सर्वोत्तम ‘इनोवेशन हब्स’ एकत्र

२०२६ हे ‘भारत-फ्रान्स नवोन्मेष वर्ष’; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा मुंबई : भारत आणि फ्रान्स या दोन

राज्यातील अतिवृष्टीत बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य द्या.

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री

महाराष्ट्र पर्यटनाला नव्या उंचीवर नेणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

एमटीडीसी’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष लोगोचे अनावरण सुवर्णमहोत्सवी कॅलेंडर व डायरीचे