महापालिकेवर येत्या बुधवारी १० स्वीकृत नगरसेवकांची होणार नियुक्ती

मुंंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच वरून वाढवून दहा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा येत्या बुधवार २५ फेब्रुवारी रोजी महापालिका सभागृहात केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाकडून कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


मुंबई महापालिकेत सध्या २२७ नगरसेवक निवडून आले असून आजवर महापालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती प्रत्येक पक्षाच्या गणसंख्येवर आधारीत कोट्यानुसार केली जाते. परंतु यंदा नगरविकास खात्याने अधिसूचना जारी करून स्वीकृत नगरसेवकांची संख्या दुप्पट वाढवत दहा एवढे सुचित केले आहे. त्यामुळे आता २२७ नगरसेवकांची निवड झाल्यानंतर महापालिका सभेला सुरुवात झालेली आहे.त्यामुळे पहिल्या सभेपासून पुढील एक महिन्याच्या आतमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड होणे आवश्यक आहे. त्यानुसार महापालिका सभागृहात येत्या २५ फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. यासाठी स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज प्राप्त होऊन आयुक्तांच्या माध्यमातून या अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र अर्जदारांची नावे सभागृहापुढे मांडली जाणार आहे. त्यामुळे यासाठी येत्या सोमवारी स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज सादर केले जाणार आहे.


स्वीकृत नगरसेवक पदासाठी वकील, प्रोफेसर, डॉक्टर किंवा खासगी स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, प्रमुख तसेच मंडळाचे प्रमुख अशाप्रकारची अर्हता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या कोट्यानुसार या अर्हतेत बसणाऱ्या किती माजी नगरसेवकांचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची यामध्ये वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेत भाजप पक्षाचे अधिक नगसेवक निवडून आल्यामुळे त्यांचे चार स्वीकृत नगरसेवक महापालिकेवर जात आहेत, तर त्याखालोखाल उबाठाचे तीन,राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेतल्यामुळे शिवसेनेचा एक जायचा तिथे आता दोन जाणार आहेत. तर काँग्रेसचा एक अशाप्रकारे स्वीकृत नगरसेवक नियुक्त केले जाणार आहेत.


स्वीकृत नगरसेवकांचे महापालिकेतील संख्याबळ


भाजप : ०४


उबाठा : ०३


शिवसेना : ०२


काँग्रेस : ०१

Comments
Add Comment

Co-operation Minister Babasaheb Patil : राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाला मध्यवर्ती संस्थेचा दर्जा; गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या (Housing Societies) विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून, राज्य सहकारी

waterborne diseases : पावसाळा कालावधीतील जलजन्य आजारांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना सुदृढ आणि निरोगी आरोग्य सेवा देण्यासाठी

Mayor Ritu Tawde : नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, महापौरांचा कठोर इशारा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : साकीनाका येथील खैरानी मार्गावर खुल्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (वय ५५ वर्षे) यांचा

Chembur tree collapse : झाड दुघर्टनाप्रकरणी दोन रस्ते अभियंत्यांवरील निलंबन कारवाईमुळे अभियंते नाराज

महापालिकेतील अभियंत्यांच्या संघटनेने निलंबन मागे घेण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूर येथील

Manholes News : मुंबईमध्ये आजही ४४४६ मॅनहोल्स जाळ्याविना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मॅनहोल्समध्ये जाळ्या न बसवल्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षे या असुरक्षित असलेल्या

Kurla Manhole News : मॅनहोल्सवरून आयुक्तांना उपमहापौरांना केले टार्गेट

दीड महिन्यांपूर्वी आयुक्तांनी दिले होते उपायुक्त,सहायक आयुक्तांना निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) :