भारत सुपर एटमध्ये कोणाविरुद्ध खेळणार ?

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ मध्ये पाकिस्तान विरुद्धचा सामना ६१ धावांनी जिंकलेला भारत अ गटातून (ए ग्रुप) सुपर एट फेरीसाठी पात्र ठरलेला पहिला संघ आहे. भारताने अमेरिका, नामिबिया आणि पाकिस्तान या तिन्ही संघांविरूद्धचे साखळी सामने जिंकले. आता भारताचा बुधवार १८ फेब्रुवारी रोजी नेदरलँड विरुद्ध साखळी सामना आहे. पण या सामन्याआधीच भारत सुपर एट फेरीसाठी पात्र झाला आहे. सुपर एट फेरीत भारत कोणकोणत्या संघांविरुद्ध खेळणार आणि भारताचे सामने कधी असणार यावरून चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आयसीसीकडून आतापर्यंतच्या निकालाआधारे भारताचे सुपर एट फेरीतले वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


प्री-सीडिंगनुसार, सुपर एट च्या ग्रुप जी १ मध्ये टीम इंडियाला एक्स १ मानले जात आहे. आता, भारतीय संघाने एक्स १ म्हणून सुपर-८मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. पुढील फेरीतील भारतीय संघाच्या तीन सामन्यांच्या तारखा देखील निश्चित झाल्या आहेत व जवळपास प्रतिस्पर्धी संघ देखील निश्चित झाले आहेत. वेस्ट इंडिजने तिन्ही सामने जिंकल्यानंतर क गटामधून पात्रता मिळवली आणि सुपर एट साठी एक्स ३ स्थान विडिंज संघाचे आहे. यासह आता हे स्पष्ट झाले आहे की भारत आणि वेस्ट इंडिज सुपर एट मध्ये भिडणार आहेत आणि त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. त्यापूर्वी भारताचा सामना दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध होणार आहे. ब गटातून अद्याप कोणताच संघ सुपर एट साठी पात्र ठरलेला नाही. त्यामुळे भारताचा सुपर एट मधील तिसरा सामना ऑस्ट्रेलिया की झिम्बाब्वेविरूद्ध होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.


भारताचे सुपर-८ मधील तिन्ही सामने भारतात होणार असून हे सामने अनुक्रमे अहमदाबाद, चेन्नई आणि कोलकातामध्ये होणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने संध्याकाळी ७ वाजता खेळवले जातील. भारताचा सुपर एट मधील दुसरा सामना कोणाविरूद्ध होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. ब गटात सुपर एट साठीचं समीकरण सध्या फारच रोमांचक झालेलं आहे. श्रीलंका त्यांचे पहिले दोन सामने जिंकून गटात आघाडीवर आहे. दरम्यान, झिम्बाब्वेने त्यांचे दोन सामने जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाला हरवून मोठा अपसेट केला आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी जर श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकला तर ते पुढील फेरीत जातील. श्रीलंकेने जर ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर श्रीलंका व झिम्बाब्वे हे संघ सुपर-८ साठी क्वालिफाय करतील आणि भारताचा दुसरा सामना झिम्बाब्वेविरूद्ध होऊ शकतं.


सुपर एट फेरीसाठी भारताचे वेळापत्रक


भारत वि. दक्षिण आफ्रिका – २२ फेब्रुवारी, अहमदाबाद
भारत वि. झिम्बाब्वे/ऑस्ट्रेलिया – २६ फेब्रुवारी, चेन्नई
भारत वि. वेस्ट इंडिज – १ मार्च, कोलकाता

Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)