Narendra Modi: डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल; भारताच्या मुक्त व्यापार करारामुळे उद्योगांना मोठा फायदा

नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेतील पुढील मोठ्या बदलात खासगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. देशाला “विकसित भारत” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उद्योग क्षेत्राने नवोन्मेष, क्षमता वाढ आणि जागतिक स्पर्धेत पुढे जाण्यासाठी धाडसी गुंतवणूक करावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


रविवार १५ फेब्रुवारी रोजी माध्यमांना दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने ‘शब्दांमध्ये आणि भावनेतही’ सुधारणा (रिफॉर्म) यांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, धोरणातील सातत्य आणि निर्णायक नेतृत्वामुळे देशात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. त्यांनी म्हटले की, उत्पादकता वाढल्यावर खासगी क्षेत्रातील मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांबरोबर नफा न्याय्य पद्धतीने वाटून घ्यावा. तसेच उद्योगांनी कमी नफा सुरक्षित ठेवण्यावर भर न देता संशोधन व विकास (R&D), पुरवठा साखळी आणि गुणवत्तेत अधिक गुंतवणूक करावी.



डिजिटल क्षेत्रात भारताची जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल:


मोदी पुढे म्हणाले की; भारताचे मुक्त व्यापार करार (FTA) अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की टेक्सटाईल, लेदर, केमिकल्स, हस्तकला आणि रत्न यांसारख्या क्षेत्रातील एमएसएमई उद्योगांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्यांनी म्हटले की भारत आज डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. व्यवहार करण्याच्या पद्धतीत झालेल्या मोठ्या बदलांमुळे, विशेषतः युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) प्लॅटफॉर्ममुळे हे शक्य झाले आहे.


त्यांनी पुढे सांगितले की डेटा सेंटर्समुळे युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. भारत जगभरातील डेटा साठवण्यासाठी तयार आहे. तसेच देशात संगणकीय क्षमता आणि डेटा सेंटर पायाभूत सुविधा वाढवून मजबूत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) परिसंस्थेची पायाभरणी केली जात असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.



संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न:


संरक्षण क्षेत्राबाबत पंतप्रधानांनी सांगितले की बदलत्या परिस्थितीनुसार सैन्याचे आधुनिकीकरण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे आणि देशाची संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. पंतप्रधानांनी पुढे सांगितले की राजकीय स्थिरता आणि धोरणात्मक स्पष्टतेमुळे गुंतवणूकदारांचा भारतावर पुन्हा विश्वास निर्माण झाला आहे. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या सरकारचा प्रत्येक निर्णय महिलांच्या कल्याणाचा विचार करून घेतला जातो आणि ‘विकसित भारत’ घडवण्यात महिलांची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

Comments
Add Comment

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी