मुंबईच्या सभागृहनेते गणेश खणकर, विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर

महापालिकेच्या गटनेत्यांची नावे केली महापौरांनी जाहीर


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत अखेर सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांची अधिकृत नावे जाहीर झाली. सभागृहनेतेपदी गणेश खणकर आणि विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापौर रितू तावडे यांनी सभागृहात केली. याबरोबरच प्रत्येक पक्षाच्या गटनेत्यांच्या नावाचीही अधिकृत घोषणा सभागृहात करण्यात आली.


मुंबई महापालिकेच्या विशेष सभेमध्ये सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेतेपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपच्यावतीने गणेश खणकर यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. त्यामुळे सभागृहनेतेपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस पक्षाच्यावतीने करण्यात आली होती. तर उबाठा पक्ष हा विरोधीपक्ष असून या पक्षाच्यावतीने गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या गटनेत्यांची सभागृहनेतेपदी तर विरोधी पक्षाच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात येत असल्याचे सभागृहात जाहीर करण्यात आले.


यानंतर शिवसेना पक्षाच्यावतीने अमेय घोले यांची गटनेतेपदी तसेच काँग्रेसच्या गटनेतेपदी अश्रफ आझमी, मनसेच्या गटनेते पदासाठी यशवंत किल्लेदार आणि एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा महापालिका सभागृहात करण्यात आली. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांच्या नावाची गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करताच उबाठाच्यावतीने पन्नास खोके, एकदम ओके अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. याला शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकत घेतली. वारंवार या घोषणा आपल्याकडून दिल्या जात असून सभागृहाचे कामकाज चांगल्याप्रकारे चालवणे हे आपले कर्तव्य आहे, पण जर विरोधकांकडून अशाप्रकारच्या घोषणा होत असतील तर खिचडीपासून डेडबॅगपर्यंतचे सर्वच आम्ही बाहेर काढून, मग आम्हाला थांबवायचे नाही असा गर्भित इशारा विश्वासराव यांनी दिला. त्यानंतरही या घोषणा सुरुच राहिल्यामुळे साहेबांचा विजय असो अशाप्रकारच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.यावर महापौर रितू तावडे यांनी उबाठाच्या नगरसेवकांना समज देत सभागृहाचे काम नीट चालवण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००

मध्य रेल्वेचा शनिवार, रविवार मेगा ब्लॉक; उपनगरीय व मेल-एक्स्प्रेस सेवांवर मोठा परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे ४ एप्रिल २०२६ रोजी ठाणे व डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्तार तसेच परळ आणि करी रोड

महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होताच आश्विनी भिडे यांनी घेतला धाडसी निर्णय

ई-ऑफिस,पेपरलेस करण्याचे सर्व खात्यांना दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी