Shankar Anna Dhondge: शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे हजारो समर्थकांसह शिवसेनेत दाखल

मुंबई : लोहा-कंधारचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘नंदनवन’ निवासस्थानी झालेल्या सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला. शिंदे यांनी शंकर अण्णा धोंडगे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे पक्षात स्वागत केले. धोंडगे यांच्या प्रवेशासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न झाले होते; मात्र अखेरीस त्यांनी शिवसेनेची निवड केली.


यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री असतानाही कार्यकर्ता म्हणूनच काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. जो काम करेल तो पुढे जाईल आणि कार्यकर्ता हा पक्षाचा कणा आहे; आमदार-खासदार-मंत्री कार्यकर्तेच घडवतात, असे त्यांनी सांगितले.





शंकरअण्णा धोंडगे यांच्या कामाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “धोंडगे हे आयुष्यभर शेतकरी चळवळीत काम करणारे नेतृत्व आहे. शेतकऱ्यांच्या वेदना आणि समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. मराठवाड्यात त्यांनी उभी केलेली संघटनात्मक ताकद मोठी आहे. अशा अनुभवी आणि लढाऊ नेतृत्वामुळे शिवसेनेची शेतकरी बाजू आणखी मजबूत होईल.”

Comments
Add Comment

Air India Airlines : एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची पश्चिम आशियातून ४२ विमानसेवा सुरु होणार

पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर, टाटाच्या नेतृत्वाखालील एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या पश्चिम

Nashik Accident : भरधाव कार थेट विहिरीत पडून ९ जणांचा हृदयद्रावक अंत

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री

IPL 2026 : पंजाबची चेन्नईवर ५ विकेट्सने मात; आयुष म्हात्रेची झुंजार खेळी व्यर्थ

- सुपर किंग्जचा सलग दुसरा पराभव; घरच्या मैदानावर नामुष्की पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सला पाच गडी राखून

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल)