Delhi Earthquake : ‘दिल्ली-एनसीआर’सह उत्तर भारतात ५.९ तीव्रतेचा भूकंप

- भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान - तजाकिस्तान सीमेवर


दिल्ली-एनसीआर आणि संपूर्ण उत्तर भारतात शुक्रवारी (३ एप्रिल) रात्री ९:४२ वाजता भूकंपाचे जोरदार (Delhi Earthquake) झटके जाणवले. दिल्ली-एनसीआर, चंदीगड, हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक भागात हे झटके जाणवले. यासोबतच जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांमध्येही जमीन हलल्यामुळे लोक घराबाहेर पडले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रवास ५.९ इतकी मोजण्यात आली असून भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तान-तजाकिस्तान सीमेवर असल्याचे सांगण्यात आले आहे.


दिल्ली-एनसीआर मधील अनेक उंच इमारतींमध्ये राहणाऱ्यांना या भूकंपाचे झटके स्पष्ट जाणवले. ऑफिस आणि घरी बसलेले लोक लगेच बाहेर पडले. काही ठिकाणी लोक पार्क आणि मोकळ्या मैदानात एकत्र झाले. जम्मू-काश्मीरच्या उधमपूर, पुंछ आणि काश्मीर खोऱ्यातील अनेक भागातही भूकंपाचे झटके जाणवले. हे झटके काही सेकंदांसाठी जाणवले. पाकिस्तानमधील इस्लामाबाद, पंजाब आणि पेशावरसह अनेक भागातही जोरदार झटके जाणवले. या भूकंपामुळे सध्या कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. प्रशासनाने लोकांना न घाबरण्याचे आवाहन केले. तसेच अफवांपासून सावध राहण्याचा इशारा दिला. भूकंपाच्या झटक्यांनंतर लोक सोशल मीडियावर आपले अनुभव शेअर करताना दिसले. अनेक लोकांनी सांगितले की त्यांना अचानक पंखे आणि फर्निचर हलताना जाणवले. सध्या प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत आणि गरज भासल्यास तत्काळ कारवाईस तयार आहेत.


भूकंपासंदर्भातील शास्त्रीय माहितीनुसार पृथ्वीच्या आत ७ टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सतत फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांशी धडकतात, रगडतात, एकमेकांच्या वर चढतात किंवा त्यापासून दूर जातात, तेव्हा जमीन हलते. यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिक्टर स्केलचा उपयोग केला जातो, ज्याला रिक्टर मॅग्निच्यूड स्केल म्हणतात.रिक्टर मॅग्निच्यूड स्केल १ ते ९ पर्यंत असते. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रस्थानी (एपिसेंटर) पासून मोजली जाते. म्हणजे त्या केंद्रातून निघणारी ऊर्जा या स्केलवर मोजली जाते. १ म्हणजे कमी तीव्रतेची ऊर्जा आणि ९ म्हणजे सर्वाधिक, अत्यंत भयंकर आणि विध्वंसक लहरी. ही लहरी दूर जाऊन हळूहळू कमजोर होतात. जर रिक्टर स्केलवर तीव्रता ७ दिसते, तर त्याच्या आजूबाजूच्या ४० किलोमीटरच्या क्षेत्रात जोराचा झटका जाणवतो.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१