T20 World Cup 2026 IND vs PAK: सूर्यकुमार यादवने केली उस्मान तारिकची नक्कल; व्हिडीओ वायरल

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. हा यंदाच्या वर्ल्डकपमधील २७ वा साखळी सामना असेल. क्रिकेटप्रेमींचे लक्ष असलेल्या या हायव्होल्टेज सामन्याआधीच एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यावर पावसाचे सावट घोंगावत आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी चिंतेत आहेत.


पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज उस्मान तारीक त्याच्या स्टाईलमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं त्याचा दबाव झुगारून दिला आहे. इतकंच नव्हे, तर त्याने उस्मान तारीकच्या स्टाईलची कॉपी करत नेट प्रॅक्टिसही केली. आजच्या सामन्यापूर्वी फलंदाजांना सराव मिळावा म्हणून सूर्यकुमारने स्वतः तारिकसारखी 'स्लिंगी' ॲक्शन करून गोलंदाजी केली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





तारिकची गोलंदाजी करण्याची पद्धत अतिशय वेगळी असून ती आयसीसीने मंजूर केली आहे. तो चेंडू टाकताना मध्येच काही काळ थांबतो आणि त्याची चेंडू फेकण्याची पद्धत 'राउंड-आर्म' स्वरूपाची आहे, ज्यामुळे फलंदाजांना चेंडू ओळखणे कठीण जाते. सूर्याने तारिकच्या गोलंदाजीचे वर्णन 'आउट ऑफ सिलॅबस' (अभ्यासक्रमाबाहेरील) असे केले आहे. त्याने स्पष्ट केले की, परीक्षेत कधीकधी असे कठीण प्रश्न येतात, पण म्हणून आपण ते सोडून देत नाही, तर त्याचा सामना करतो. भारतीय संघ अशा आव्हानासमोर हार मानणार नाही, असेही त्याने नमूद केले.





भारतीय संघाने यापूर्वीही अशा विशिष्ट गोलंदाजांचा सामना करण्यासाठी अनोख्या पद्धती वापरल्या आहेत. २०१६च्या आशिया चषकात ७ फूट उंच मोहम्मद इरफानचा सराव करण्यासाठी भारतीय फलंदाजांनी स्टूल आणि खुर्च्यांवर उभे राहून 'थ्रो-डाउन' घेतले होते. माजी फिरकीपटू हरभजन सिंगच्या मते, उस्मान तारिक हा एक कठीण गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनेक वैविध्यपूर्ण चेंडू आहेत. मात्र, भारतीय संघ त्याचा सामना करू शकतो, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो