भोपाळमध्ये पत्नीने प्रेयसीला विकला पती, जुदाई सिनेमाची पुनरावृत्ती

भोपाळ : श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांचा जुदाई हा हिंदी सिनेमा ९० च्या दशकात प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या कथेशी मिळतीजुळती अशी घटना वास्तवात अलीकडेच मध्य प्रदेशमधील भोपाळमध्ये घडली.


भोपाळमध्ये ४२ वर्षांचा सरकारी अधिकारी त्याचे काम व्यवस्थित करत होता. या अधिकाऱ्याच्या विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या ५४ वर्षीय महिलेला हा अधिकारी आवडू लागला. हळू हळू दोघांमधील जवळीक वाढली. कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीचे रुपांतर आधी मैत्रीत नंतर प्रेमात झाले. या प्रेमापोटी सरकारी अधिकारी स्वतःच्या घरी कमी वेळ देऊ लागला. यातून घरी वाद वाढले. परिस्थिती बिघडत गेली. अखेर अधिकाऱ्याच्या १६ आणि १२ वर्षांच्या मुलींपैकी मोठ्या मुलीने न्यायालयात दाद मागितली.


न्यायालयात सुनावणी सुरू झाली त्यावेळी ४२ वर्षीय अधिकाऱ्याने आपले कार्यालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यावर प्रेम असल्याची कबुली दिली तसेच पत्नीसोबत राहण्याची इच्छा नाही असेही सांगितले. त्याचवेळी मुलींवर प्रेम आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ते सर्व काही करण्याची तयारी दाखवली. अधिकाऱ्याच्या प्रेमात असलेल्या महिलेनेही नात्याची कबुली दिली आणि प्रियकराने मुलींच्या भविष्यासाठी नियोजन केल्यास हरकत घेणार नसल्याचे स्पष्ट केले. अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीने स्वतःच्या आणि मुलींच्या भविष्याचा विचार करून तडजोड केली. पत्नीने घटस्फोट घेण्याच्या बदल्यात स्वतःसाठी आणि पोटच्या दोन मुलींसाठी एक डुप्लेक्स फ्लॅट आणि २७ लाखांची रोख रक्कम अशा एकूण दीड कोटी रुपयांची मागणी केली. पतीच्या प्रेयसीने ही किंमत मोजण्याची तयारी दाखवली. यानंतर परस्पर सहमतीने घटस्फोट झाला.


लग्नानंतरच्या प्रेमातून निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी भोपाळमध्ये दीड कोटी रुपयांत झालेला हा पहिलाच घटस्फोट आहे. यामुळे पत्नीने दीड कोटी रुपयांत प्रेयसीला पती विकल्याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.


श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर आणि अनिल कपूर यांच्या जुदाई सिनेमात पैशांच्या लालसेतून श्रीदेवी पतीला दूर करते आणि नंतर तिला चुकीची जाणीव होते असे दाखवले होते. भोपाळच्या घटनेत पती आणि पत्नी यांच्या जुदाईचे कारण पती आणि त्याची प्रेयसी यांच्यातील नाते आहे. भोपाळच्या महिलेने वास्तवाचे भान राखून स्वतःच्या आणि मुलीच्या भविष्याच्या विचार करून घटस्फोट घेतला आहे. पण या घटनेच्या निमित्ताने बदलत्या कौटुंबिक नातेसंबंधांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह