Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या धडाकेबाज कारवायांत विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित १६ संशयितांना अटक करण्यात आली आहे. गुजरात एटीएसला अलीकडच्या काळात मोठे यश मिळाले आहे. बंदी घातलेल्या 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ संशयितांना गुजरात आणि मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. त्यांच्यावर यूएपीएअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



याव्यतिरिक्त, एप्रिल २०२६ मध्ये 'आयएसआयएस' प्रेरित दोन आणि जुलै २०२५ मध्ये बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये गुंतलेल्या व 'अल-कायदा'शी संबंधित चार दहशतवाद्यांना एटीएसने गजाआड केले आहे. हे आरोपी कट्टरपंथी मजकूर पसरवणे आणि सोशल मीडियाद्वारे तरुणांची दिशाभूल करत होते. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था 'आयएसआय' समर्थित एका मोठ्या दहशतवादी आणि शस्त्रास्त्र नेटवर्कचा पर्दाफाश केला. पंजाब आणि दिल्लीतून अटक केलेल्या शुभदीप सिंग, गुरजंत सिंग, साजन सिंग आणि गगनप्रीत या चार संशयितांना दिल्लीतील धार्मिक स्थळे आणि पोलीस मुख्यालयांची 'रेकी' करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे आरोपी पाकिस्तानमधील हँडलर्सच्या संपर्कात होते. या सलग कारवायांनी दहशतवाद्यांच्या देशविरोधी कारवायांना मोठा धक्का दिला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या या सतर्कतेमुळे एक मोठा अनर्थ टळला असून, या प्रकरणांचा अधिक तपास सुरू आहे.  (Terror )



याआधी एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने चालणाऱ्या दहशतवादी आणि शस्त्र तस्करीच्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे या प्रकरणात, पोलिसांनी पंजाब आणि दिल्लीतील चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. जे एका पाकिस्तानी हँडलरच्या सांगण्यावरून राजधानीवर हल्ला करण्याचा कट रचत होते. अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलासह दोन परदेशी बनावटीची पिस्तूलं, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी