Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी योग्य उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह(Shivraj Singh) चौहान यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी नुकत्याच आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान तोतापुरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.



या संवादादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर लागवड केल्या जाणाऱ्या तोतापुरी आंब्याच्या दरात गेल्या काही महिन्यांत लक्षणीय घट झाली आहे. आंब्याच्या किमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे त्यांच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून, राज्यातल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकरणाची त्वरित दखल घेत, चौहान यांनी 'आयसीएआर(ICAR)'ला तोतापुरी आंबा क्षेत्राचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी शास्त्रज्ञ आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. आंब्याची लागवड आणि प्रक्रिया, ते विपणन, देशांतर्गत व्यापार आणि निर्यात, या संपूर्ण मूल्य साखळीची तपासणी करून, शेतकऱ्यांचा परतावा सुधारण्यासाठी आणि या क्षेत्राला शाश्वत आधारावर बळकट करण्यासाठी योग्य उपाययोजना सुचवण्याची जबाबदारी या समितीवर सोपवण्यात आली आहे.



तोतापुरी आंबा उत्पादकांचे उत्पन्न आणि उपजीविका सुरक्षित ठेवणे ही सरकारची प्राथमिकता असल्याचे चौहान यांनी यावेळी सांगितले. आंबा उत्पादकांना शाश्वत आधार देण्यासाठी, मूल्य साखळी बळकट करण्यासाठी आणि या क्षेत्रात मूल्यवर्धन, निर्यात, गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी समितीच्या शिफारशींच्या आधारावर योग्य उपाययोजना केल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Chamoli tunnel tragedy : ७ कामगारांचा मृत्यू; ३ अद्याप बेपत्ता, बचावकार्य युद्धपातळीवर

चमोली : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी परिसरात THDCच्या जलविद्युत प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा