तरुण नोकरी मागायला आला आणि बंदूक असलेली बॅग विसरला, आमदार केनेकरांच्या केबिनमध्ये सत्य उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्याकडे एक तरुण नोकरी मागायला गेला आणि त्यांच्या कार्यालयातच एअरगन असलेली बॅग विसरला, हे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आले. याच घटनेची शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली.


शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात पिस्तूल असलेली एक बाग सापडल्याने गोंधळ उडाला होता. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत कंत्राटी नोकरीसाठी भाजपचे आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात शिफारसपत्र मागायला गेलेला तरुण बॅगसह त्यातील एअरगनही तेथेच विसरला. शनिवारी केनेकर यांचे सहकारी कार्यालयात गेल्यानंतर पिस्तूल पाहताच एकच गोंधळ उडाला.


पोलिसांच्या तपासणीत ती एअरगन असल्याचे समोर आले. त्यानंतर क्रांतीचौक पोलिसांनी रितेश संतोष होळकर याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रितेश बीएस्सीच्या तृतीय वर्षात आहे. काही दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. महानगरपालिकेत कंत्राटी नोकरी मिळवण्यासाठी त्याला एकाने केनेकर यांच्याकडून शिफारसपत्र घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता. तो शुक्रवारी सायंकाळी तेथे गेला. सहा महिन्यांपूर्वी त्याने ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून एअरगन हौस म्हणून खरेदी केली होती. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



नेमकं प्रकरण काय?



भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एअर गन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच विसरली गेली होती. त्या बॅगेत एअर गन सापडली. या घटनेनंतर आमदार केनेकर यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला जात होता. भेटीसाठी आलेल्या व्यक्तीच्या बॅगेत बंदूक आढळल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांच्या तपासात घटनेचे सत्य समोर आले आहे.

Comments
Add Comment

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू

संगमनेर नगरपालिकेत नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

संगमनेर: शहराच्या प्रलंबित विकासकामांवरून आणि वारंवार सूचना देऊनही प्रशासन दाद देत नसल्याच्या निषेधार्थ

Unseasonal rain : ऐन उन्हाळ्यात विदर्भात हलका ते मध्यम पावसाची शक्यता

उष्ण लाटेने त्रस्त असलेल्या विदर्भवासीयांसाठी हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या