रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाले. आनंद सागर यांनी मुंबईत ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून पार्किसन्स या आजारामुळे आनंद सागर त्रस्त होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते. या आजारपणातच त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.


आनंद सागर हे १९८७ मध्ये तयार झालेल्या रामायण या टीव्ही मालिकेचे सह निर्माते होते. वडील रामानंद सागर यांच्या पश्चात त्यांचा वारसा आनंद यांनीच समर्थपणे पुढे चालवला. आनंद सागर यांनी पौराणिक आणि भक्तीपर प्रकल्प केले. एकूण पाच भावंडांमध्ये केवळ आनंद सागर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला. ‘रामायण’ नंतर त्यांनी ‘अलिफ लैला’, ‘जय जय बजरंगबली’ आणि ‘जय शिव शंकर’ सारख्या मालिकांची निर्मिती केली. त्यांनी ‘आँखें’ आणि ‘अरमान’ सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील केली.


सागर कुटुंबाने आनंद सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी प्रसारमाध्यमांना दिली आहे. ही बातमी कळताच आनंद सागर यांच्या परिचितांपैकी अनेकांनी शोक व्यक्त केला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर करत सागर कुटुंबाने 'आम्ही आमच्या प्रिय वडिलांचे, आनंद रामानंद सागर चोप्रा यांचे निधन झाल्याची माहिती देत आहोत' असे नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत

Drishyam 3 The Conclusion : अजय देवगण पुन्हा विजय साळगावकरच्या भूमिकेत; 'दृश्यम 3'चा थरार वाढणार, 'द कन्क्लुजन'ची घोषणा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या आयकॉनिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Raksha Bandhan Controversy : 'बिकिनी घालून राखी बांधणार का?' रक्षाबंधनच्या जाहिरातीवर कंगना रणौत संतापली; कृति सॅनॉनला सुनावलं

कंगना रणौतने रक्षाबंधनच्या जाहिरातीतील पोशाखावरून अभिनेत्री कृती सॅनॉनवर निशाणा साधला. ‘जीवा’च्या जाहिरातीत