कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्या

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश – विदेशातून महिला भाविक येतील. या महिला भाविकांच्या संरक्षणासाठी सर्वोतोपरी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी दिल्या.


नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी नाशिक विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर (नाशिक ग्रामीण), पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण (नाशिक शहर), नियोजन विभागाचे सहसंचालक योगेंद्र चौधरी, तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते, तर पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे (धुळे), महेश्वर रेड्डी (जळगाव), श्रवण दत्त (नंदुरबार), अपर पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे (अहिल्यानगर) हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.


उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिला भाविकांची संख्या मोठी राहील. या पार्श्वभूमीवर महिलांच्या संरक्षणासाठी पुरेशा उपाययोजना कराव्यात. महिलांसाठी मदत केंद्रे, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृहांची सुविधा असावी. तसेच दिव्यांगासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.


महिला अत्याचाराच्या घटनांच्या प्रतिबंधासाठी तालुकास्तरावर भरोसा सेल कार्यरत असतात. ज्या तालुक्यांमध्ये भरोसा सेल नसेल तेथे जिल्हास्तरीय भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधावा. कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिसांनी महसूल अधिकाऱ्यांसमवेत नियमितपणे बैठका घ्याव्यात. पती- पत्नीत समेट झाल्यानंतर या कुटुंबाच्या संपर्कात राहावे. त्यासाठी आवश्यकतेनुसार गृहभेट करावी. अमली पदार्थ प्रतिबंधासाठी उपाययोजना कराव्यात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घ्यावी. पोक्सो कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील पीडितेचे समुपदेशन करावे.


रेल्वे प्रवासात महिलांशी निगडित काही अप्रिय घटना घडू नये. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे व पोलिस दलाने नियमितपणे संवाद साधावा. दक्षता समिती, नागरी हक्क संरक्षण समितीच्य बैठकांमध्ये महिलांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी रिक्षा, शालेय बसची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सहकार्याने नियमितपणे तपासणी करावी. तसेच महिला अत्याचाराच्या घटनांचा सखोल तपास करून दोष सिद्धीचे प्रमाण अधिक वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

विशेष पोलिस महानिरीक्षक कराळे यांनी सांगितले की, विभागातील पाचही जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिस दलाच्या माध्यमातून विविध उपाययोजन करण्यात येत आहेत. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी ड्रोनची मदत घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी कारवाई करून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येत आहेत. पोलिस अधीक्षक धिवरे, दत्त,  रेड्डी,  मिरखेलकर,  कलबुर्गी,  चव्हाण यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलातर्फे सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.

Comments
Add Comment

Women's and Children's Health : महिला व बालकांच्या पोषणात मोठी सुधारणा करण्याचे लक्ष्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राज्यातील कुपोषणावर प्रभावी नियंत्रण मिळवून महिला व बालकांच्या आरोग्य (Women's and Children's Health) आणि पोषणात लक्षणीय

Ashok Kharat Case : शिक्षण विभागाच्या शालेय आयडी घोटाळ्यातही भोंदू बाबा खरातचा सहभाग, स्वतःच्या भावाला मिळवून दिले आयडी

मुंबई : भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या प्रकरणांमध्ये आता नवीन ट्विस्ट निर्माण झाला असून नाशिक शहरांमध्ये काही

Weather Update: राज्यात अवकाळीचा तडाखा, हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना तीन तासासाठी अलर्ट

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. पुणे हवामान विभागाने मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट'

ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसाने झोपडले; आयटी पार्कमध्ये साचला बर्फ

पुणे : ऐन उन्हाळयात भर दुपारी पावसाने पुण्यात हजेरी लावली. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा पाऊस आणि गारपिटीने

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार 'टेक ऑफ'

मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासासाठी १०० टक्के 'व्हिजिएफ' मंजूर; फ्लाय ९१ कंपनीची निवड, प्रति आसन २ हजार ९९१ रुपये

बिकट परिस्थिती, घरची जबाबदारी, अन पोलीस भरतीच स्वप्न; नेमकं भरतीवेळी शरीर थकलं अन्...

पुणे : अनेक होतकरू तरुण सरकारी नोकरीचा पाठलाग करत असतात. नोकरी मिळवून कुटुंबाला गरीबीतून बाहेर काढण्याचं स्वप्न