Free School Bag: राज्यसरकारच्या मोठा निर्णय! १ ते ८ विच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

मुंबई: राज्यसरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार आहेत.



४१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ:


सविस्तर माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येणार आहे. यासाठी १६५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत ही दप्तरं पुरवण्यात येणार आहेत. या योजनेचा राज्यातील ४१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे.


शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी (१३ फेब्रुवारी) जारी केला. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा २००९ आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाने म्हटले आहे.


ही योजना 'विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे' या विद्यमान योजनेंतर्गतच राबवली जाणार आहे. दप्तर हे शैक्षणिक साहित्याचा भाग असल्याने त्यासाठीचा खर्च संबंधित निधीतूनच करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद केले आहे.


या दप्तरांच्या खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले असून, खरेदी प्रक्रियेत उद्योग विभागाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनाला सादर करणे बंधनकारक राहणार आहे.



या शाळांना वगळण्यात येणार:


ज्या महानगरपालिकांमध्ये अगोदरच ही योजना राबवली जाते अथवा विद्यार्थ्यांना त्यासाठी निधी दिला जातो. त्या शाळांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. पण इतर सरकारी शाळांमध्ये या योजनेतंर्गत मोफत दप्तर देण्यात येणार आहे. या योजनेत चांगली दप्तर मिळावीत अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. हलक्या दर्जाची अथवा बाजारगाळे दप्तरांचा पुरवठा करण्यात येऊ नये अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून हा उपक्रम सुरू होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

महत्वाच्या हॉस्पिटॅलिटी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना

Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका पुढील वर्षीच?

- 'एसआयआर' प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कार्यवाही नको; केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका मुंबई : राज्यातील

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला