मुंबईत स्वच्छतेबाबतच्या स्पर्धा भरवणार, मुंबईला पहिल्या क्रमांकावर आणणार

भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला निर्धार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आपण सर्वांनी मुंबई महानगराला सतत स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे. यासाठी अभिनेते अक्षय खन्ना यांनी स्वच्छतेच्या स्पर्धेची संकल्पना मांडली. ज्यात अंधेरीची स्पर्धा पार्ल्यासोबत, पार्ल्याची सांताक्रुझसोबत, सांताक्रुझची वांद्र्यासोबत, वांद्रेची माहीमसोबत, माहीमची दादरसोबत आणि दादरची मलबार हिलसोबत अशा प्रकारे एक स्वच्छतेची स्पर्धा आयोजित करा, असे मत त्यांनी मांडले. येणाऱ्या काळात याबाबत नक्कीच विचार करू. मुंबई सध्या स्वच्छ भारतमध्ये ९ व्या क्रमांकावर आहे. लवकरच मुंबईला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला.



राणीबागेतील पुष्पोत्सवानंतर अंधेरी पुष्पोत्सवाचे शनिवारी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी अभिनेते, पद्मश्री अक्षय कुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जुहू परिसरातील व्ही. एम. मार्गावरील मुंबई महानगरपालिकेच्या पुष्पा नरसी उद्यानात हा दोन दिवसीय उत्सव भरविण्यात आला आहे. शनिवार, १४ फेब्रुवारी आणि रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्व नागरिकांसाठी खुला आहे. या उद्घाटन प्रसंगी बोलतांना आमदार अमित साटम यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, आमदार अमित साटम, आमदार हारुन खान, नगरसेविका सुधा सिंह, नगरसेवक दीपक कोतेकर, नगरसेवक रोहन राठोड, नगरसेवक अनिश मकवानी, नगरसेविका सुनिता मेहता, नगरसेवक विठ्ठल बंदेरी, नगरसेवक रुपेश सावरकर, नगरसेविका सायली कुलकर्णी, उप आयुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे, के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले, महानगरपालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी व विविध मान्यवर उपस्थित होते.



या पुष्पोत्सवात तुम्ही काय पहाल ?


अंधेरीतील पहिल्या पुष्पोत्सवाला स्थानिक नागरिक, महानगरपालिका शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक आदी भेट देत वैविध्यपूर्ण रंगीत फुलांनी साकारलेली संगीत क्षेत्रातील वाद्यांच्या प्रतिकृती…फुलांनी सजविलेले मोर-फुलपाखरू, हत्ती-घोडे आणि सनई-चौघडे, तुतारी…बहरलेली फुलझाडे…आश्चर्यचकीत करणारी पिटुनिया, ब्रोकोली, साल्विया वनस्पती…झेंडू, गुलाब, मोगरा आदींसह मनमोहून टाकणारी सुगंधी फुलांची सजावट…औषधी वनस्पती…वेली, भाजीपाला… आणि या सर्वांसाठी खते, कुंड्या अशाप्रकारे यामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.


अंधेरी पुष्पोत्सवात रंगीबेरंगी फुलांच्या सजावट करण्यात आली आहे. तसेच बागेसाठी झाडे, कुंड्या, खते, उद्यानातील अवजारे, विविध रोपे व झाडांची नर्सरी, फुलांपासून बनवलेली औषधे, कीटकनाशके, फवारणी यंत्रे, खते आदी दालनेही आहेत. यासोबतच वेगवेगळ्या बोन्साय प्रजाती, शोभेच्या वनस्पती, फुले, भाज्या, औषधी वनस्पतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

सोमवारी महापालिका सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई: मुंबईचे महापौरआणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी

Mulund Metro Accident: मुलुंड मेट्रो स्लॅबप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली कारवाई

मुंबई: मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री

नेपियन्सी रोडचे होणार सिमेंट काँक्रिटीकरण, येत्या मंगळवारपासून कामाला सुरुवात

पावसाळ्यापूर्वी एका मार्गिकेचे करणार काम पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेमार्फत, मुकेश चौक ते

महापौरांनी गोवंडीतील पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालयाला दिली अचानक भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या महापौरपदी विराजमान होताच मुंबईतील महापालिका रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था

NH-160A महामार्गाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत

मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून १ ठार, ३ जखमी; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : मुंबई मेट्रो लाईन चारच्या पॅरापेटचा काही भाग शनिवारी दुपारी मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री रोडवर