मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची घोषणा करून बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईच्या नवनिर्वाचित महापौरांनी यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून शहरातील फेरीवाल्यांची नोंद, त्यांचे परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्या संदर्भातील कागदपत्रांची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये फेरीवाल्यांची खरोखरच झाडाझडती घेवून त्यांना हटवले जाते की प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी हे कारवाईची नौटंकी करत महापौरांच्या निर्देशांना केराची टोपली दाखवतात हे येत्या काही दिवसांमध्ये दिसून येणार आहे.


मुंबईतील वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांसंदर्भातील तक्रारींच्या अनुषंगाने महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित केली होती. याबैठकीला भाजपचे नेते किरीट सोमय्यांसह इतरही भाजपचे नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत नवनिर्वाचित महापौरांनी, मुंबईत फेरीवाला व्यवसाय करणाऱ्यांची आधार कार्ड इतर शासकीय ओळखपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच ज्यांच्याकडे अवैध कागदपत्रे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याबाबत महानगरपालिका आणि पोलीस विभाग यांच्यात समन्वय वाढवण्याचे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.


गेल्या काही वर्षात मुंबईत फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याच्या आणि त्यामध्ये परदेशी नागरिक अवैधरित्या वास्तव्यास राहून व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. यामुळे स्थानिक फेरीवाल्यांचा आर्थिक ताण वाढण्यासोबतच काही भागात महिलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. फुटपाथवरील गर्दी, अतिक्रमण आणि अनधिकृत व्यवसायामुळे कायदा सुव्यवस्थेचा समस्या निर्माण होत असून या पार्श्वभूमीवर अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौर रितू तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.त्यासोबतच विविध प्रभागांमध्ये कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments

Sudhir Bhalekar    February 15, 2026 06:59 AM

असे निदर्शनात आले आहे की म्हणजे कार्पोरेशन ची गाडी येण्याच्या आधी काही काळासाठी एक माणूस येऊन समोरील व्यक्तींना गाडी येते म्हणून सांगतो काही काळासाठी फेरीवाले उठतात आणि गाडी गेल्यानंतर लगेच बसतात याचा अर्थ असा आहे की इथे मोठा भ्रष्टाचार आहे.

Prabhakar Kulkarni    February 14, 2026 11:35 PM

हे अत्यावशक आहे. फेरीवाले, पार्किंग अर्धा रस्ता व्यापतात. जीव मुठीत घेऊन चालावे लागते. करवाहीत सत्यत्य रहावे ही अपेक्षा.

Sanjay dhuwali    February 14, 2026 12:57 AM

हे आपल्यासाठी नवीन नाही जो आयुक्त किंवा महापौर बसतो तेव्हा मोठं मोठी विधाने केली जातात त्यांना घाबरवून दहशत निर्माण केल्याशिवाय त्यांना पैसे देणार कोण हा त्यामागचा हेतू आहे. मुंबईत जवळपास पंचवीस लाख झोपड्या वाढल्या यां एक दोन वर्षात नाही, आजही सर्रासपने बेकायदेशीर बांधकामे होतं आहेत त्यामुळे हे सगळे फुसके बार आहेत

Prashant    February 14, 2026 12:14 AM

Pls inform BMC to check shopkeeper and hawkers encroachment on sakinaka pipe line road. Starting from parerawadi to sakinaka sbi bank end.

Add Comment

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मुंबईत पाण्याची समस्या, नगरसेवकांनी सुरु झाली रडारड

स्थायी समितीत विशेष सभेचे आयोजन करण्याचे अध्यक्षांचे आश्वासन मुंबई : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व

सिध्दार्थ रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास संथगतीने, महापौरांनी व्यक्त केली नाराजी

मुंबई :  गोरेगाव (पश्चिम) येथील सिद्धार्थ रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर रितू तावडे यांनी अचानक