‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई एमएमआर क्षेत्रातील महापालिकांनी पॉड टॅक्सी सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.


मेट्रो आणि लोकल प्रवासाला पूरक अशी ‘पॉड टॅक्सी’ सेवा एमएमआरमधील शहरांत सुरू करण्याबाबत सविस्तर आढावा उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला. नागरिकांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' देण्यास महापालिकांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.


नंदनवन येथे झालेल्या या आढावा बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, एमएमआरडीएचे अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, आदी अधिकारी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, प्रवाशांना घरापासून रेल्वे किंवा मेट्रो स्टेशनपर्यंत आणि तिथून गंतव्य स्थान हा टप्पा पार करण्यासाठी रिक्षा किंवा बसवर अवलंबून राहावे लागते. यासाठी होणारी गर्दी, तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून पॉड टॅक्सी चालवण्याचे नियोजन करावे. यामुळे मेट्रोचा वापर वाढण्यास मदत होईल आणि रस्त्यांवरील खासगी वाहनांचा भार कमी होईल. हा प्रकल्प राबवण्यासाठी एमएमआरडीएची मदत घेण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत. महापालिकांनी आपल्या विकास आराखड्यात लास्ट माईल कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून इंधन बचतीमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Coastal Road : ‘कोस्टल रोडवरील ‘जय हो’ला ब्रेक!’ रहिवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारपट्टी मार्गावर म्हणजेच कोस्टल रोडवर

मुंबईतील सर्वच स्कायवॉकवर उभारणार सरकते जिने; स्थायी समिती सदस्यांनी केली मागणी

मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे

मुंबईतील फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत शुक्रवारी होणार निर्णय; महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत प्रशासनाला दिले जाणार निर्देश

मुंबई: मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्यादृष्टीकोनातून पात्र फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित

सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ?

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या

घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा

मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.