मंत्रालयात लाच घेताना लिपिकाला अटक

मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिकाला लाच घेताना मंत्रालयात सापळा रचून मोठी कारवाई केली. राजेंद्र ढेरंगे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्वरत करून देण्यासाठी त्याने ५० हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. मंत्रालयातल्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. तक्रार आल्यानंतर मंत्री नरहरी िझरवाळ यांच्या कार्यालयात अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी पोहोचले होते. कारवाई करताना झिरवाळ यांचं कार्यालय पूर्ण ताब्यात घेतले. तपास झाल्यानंतर मग या संबंधित लिपिकाला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय उघडण्यात आले.

Comments
Add Comment

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य