Ambernath traffic: महाशिवरात्रीनिमित्त अंबरनाथच्या वाहतुकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्गांबद्दल

अंबरनाथ : महाशिवरात्री उत्सवानिमित्त अंबरनाथमधील प्राचीन अंबरेश्वर शिवमंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच पार्श्वभूमीवर आता १४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान शहरातील वाहतुकीत काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.



हे मार्ग राहतील बंद:


मिळालेल्या माहितीनुसार, काही मुख्य मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी लागू असेल. वैभव हॉटेलकडून शहरात थेट प्रवेश बंद राहील. संबंधित वाहनांना हिंदू स्मशानभूमी, वडवली सेक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे वळवण्यात येईल. स्वामी समर्थ चौकातून गोविंद तीर्थ पुलाकडे जाणाऱ्या वाहनांनाही ‘नो एन्ट्री’ असेल.

अवजड वाहनांची सोय:


अवजड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात येण्यास मनाई करण्यात आली आहे. एमआयडीसी आणि अन्य जड वाहनांसाठी आनंदनगर टी-जंक्शन, फॉरेस्ट नाका आणि लादीनाका हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.



पार्किंगची सुविधा:


लहान वाहनांसाठी हिंदू स्मशानभूमी ते गोविंद तीर्थ पुलादरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. बस व मोठ्या वाहनांसाठी लोकनगरी मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. भाविकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

राज्यात लॉकडाऊन अजिबात लागणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

- अफवा पसरवणाऱ्यांना फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात इंधन आणि गॅसचा

Ashok Kharat Case Update: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर, भोंदूबाबाची HIV टेस्ट पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक: नाशिकमधील भोंदुबाबा अशोक खरातच्या अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून

एसआयटीला अशोक खरातच्या ऑफिसमध्ये काय काय दिसलं?

मुंबई: अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून कसून

श्रीरामपूरमध्ये राम नवमीदिवशी मिरवणुकीवर दगडफेक, १२ जणांवर गुन्हा

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात रामनवमीच्या उत्सवाला दगडफेकीचे गालबोट लागले आहे. गोंधवणी

Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात विरुद्धच्या तक्रारींना पूर; SIT च्या हेल्पलाईनवर १०० हून अधिक तक्रारी दाखल

मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अघोरी पूजा आणि

Maharashtra Rain Update: राज्यातील 'या' भागात दोन दिवस वादळी पावसाचा अलर्ट

मुंबई: सध्या राज्यातील काही भागात अंशतः हवामान आभाळी असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे.