UBT: उबाठाकडून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली; परभणीत बसवला मुस्लिम महापौर

मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्या प्रखर हिंदुत्वाचा आणि मराठी अस्मितेचा विचार जपला, त्या विचारांना पूर्णपणे तिलांजली देण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केले आहे. ज्या परभणीने आजवर शिवसेनेच्या भगव्याला भक्कम साथ दिली, त्याच शहरात आता केवळ सत्तेच्या लांगुलचालनासाठी उबाठा गटाने मुस्लिम महापौर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे 'मुंबईत जर उबाठाची सत्ता आली असती, तर तिथेही बुरखेवालीच महापौर दिसली असती', या भाजपच्या दाव्यावर आता परभणीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे.


भाजप मुंबईचा महापौर हा हिंदू आणि मराठीच देणार, हे स्पष्ट असतानाही उबाठा गटाने मुंबईकरांच्या मनात सातत्याने 'फेक नॅरेटिव्ह' पसरवण्याचे काम केले. मात्र, आता त्यांनी परभणीत मुस्लिम महापौर देऊन स्वतःचा खरा चेहरा उघड केला आहे. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी शहरात उबाठा गटाने महापौरपदासाठी सय्यद इकबाल यांची निवड केली. याउलटज्या काँग्रेसवर लांगुलचालनाचा आरोप होतो, त्यांनी मात्र उपमहापौरपदासाठी गणेश देशमुख यांना संधी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीच्या राजकीय वर्तुळात आणि निष्ठावान शिवसैनिकांमध्ये तीव्र आश्चर्य व संताप व्यक्त केला जात आहे.



बाळासाहेबांना साथ देणारे शहर


परभणी हे शहर नेहमीच हिंदुत्ववादी विचारांशी जोडलेले राहिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून इथल्या मतदारांनी सातत्याने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. ज्या शहरात शिवसेनेची वाढच मुळी प्रखर हिंदुत्वाच्या जोरावर झाली, तिथे केवळ राजकीय तडजोडीपोटी मुस्लिम महापौर लादणे, हा सामान्य हिंदू मतदारांचा विश्वासघात असल्याची भावना जनमानसात उमटत आहे.



हिंदू मतदारांमध्ये नाराजीचा सूर


उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय सोयीसाठी मूळ विचारांना बाजूला सारल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसले आहे. मात्र, परभणीतील या निर्णयाने 'जनाब सेने'चा खरा चेहरा समोर आला आहे. "बाळासाहेबांचे विचार आता फक्त नावालाच उरले असून, प्रत्यक्षात उबाठा गट केवळ विशिष्ट मतांच्या राजकारणासाठी लांगुलचालन करत आहे," अशी टीका भाजपचे माध्यम विभाग प्रमुख नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. दरम्यान, उबाठाच्या या निर्णयामुळे परभणीतील हिंदू मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी राज्यभर चर्चेत असलेला स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्यावर

इराणचा कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला

बुबियान बेट : इराणने कुवेतच्या बुबियान बेटावरील अमेरिकेच्या नौसैनिकांवर हल्ला केला. यात मोठ्या प्रमाणात

हुथी-हिजबुल्लाहच्या प्रवेशाने जगावर अणुयुद्धाचे संकट

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आता एका महिन्यानंतर अत्यंत भीषण वळणावर पोहोचले

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.