पनवेलमध्ये स्कूल बसला अपघात, विद्यार्थी जखमी

पनवेल : भरधाव टेम्पोने समोरुन स्कूल बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन शालेय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पुणे-मुंबई हायवेवर पारपुंड गावाजवळील वेलकम हॉटेलच्या समोरील रस्त्यावर घडली आहे.


संदीप मोहिते विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूलबस घेऊन जात होता त्याचवेळी मिलिंद सपकाळने टेम्पो बेजबाबदारपणे चालवत पुढे आणला. यामुळे टेम्पो आणि स्कूलबस यांची समोरून एकमेकांना धडक बसली.


अपघातात स्कूल बसमधील आठ वर्षीय मुलगी तसेच १६ वर्षीय मुलगा हे दोघे जखमी झाले आहेत. तसेच स्कूल बसचे सुद्धा नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टेम्पो चालकाला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सपोनि सचिन पोवार करीत आहेत.

Comments
Add Comment

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या

नालेसफाईच्या कामाला गती, मिठीनदीच्या सफाईला रविवारपासून होणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्‍यातून गाळ

Crime News : यवतमाळ हादरले! अर्धवट जळालेल्या 'त्या' तरुणीच्या मृतदेहाचं गूढ उकललं; पहिला गळा आवळला अन् मृतदेह जाळून....

यवतमाळ : जोडमोहा शिवारातील तासलोट जंगलात १५ दिवसांपूर्वी एका २६ वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह

देशात इंधनाचा तुटवडा नाही, तरीही पंतप्रधान मोदींची स्ट्रॅटर्जी तयार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई मुंबई : जागतिक स्तरावर इंधनाचे मोठे संकट उभे

राज्यात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

महावितरणच्या पाच वर्षांच्या दरपत्रकाला आयोगाची मंजुरी; १०० युनिटपर्यंतच्या वापरासाठी आता प्रति युनिट ७.१०

महाराष्ट्रात पशुपालकांसाठी दिलासा; मदतीच्या नियमांत मोठा बदल

दुधाळ जनावरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्याना मदतीची रक्कम जाहीर मुंबई : गेल्या वर्षी जून ते सप्टेंबर या काळात