काँग्रेसने पहिल्याच सभागृहात उबाठाचा मीटर केला डाऊन

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठा पक्ष हा प्रमुख विरोधी पक्षनेता असला प्रत्यक्षात उबाठाला विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावण्याची संधी दिली नाही. सभागृहात बसण्यास जागा नसल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौर निवडीच्या प्रक्रियेपासूनच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि काँग्रेसच्या या घोषणाबाजीला उबाठाला बळ देत होते. परंतु काँग्रेसला बळ देतानाच आपलाच मीटर कधी डाऊन कधी टाकला हेच उबाठाला कळले नाही.


मुंबई महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या विशेष सभेमध्ये काँग्रेसचे २४ नगरसेवक सभागृहात वंदे मातरमचे गीत संपल्यानंतर दाखल झाले. परंतु तोपर्यंत सभागृहात सर्वच पक्षांच्या नगरसेवक हे आसनांवर बसलेले होते. त्यामुळे त्यांना बसण्यास जागा शिल्लक राहिले नाही. त्यामुळे बसण्यास जागाच नसल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक हे मधल्या रांगेत प्रथम उभे राहत त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक महापौरांच्या भाषणावेळी महापौरासमोरील जागेमध्ये जावून तिथे उभे राहून घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनीही त्यांना विरोध दर्शवल्यानंतर त्यांना मागे सरायला लागले.त्यानंतर काँग्रेसच्या मेहेरअली हैदरसह काही नगरसेवकांनी सभागृहात जमिनीवर बसण्यास सुरुवात केली. आपले सदस्य जमिनीवर बसल्याचे दाखवून काँग्रेसच्या नगरसेवकांनीही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिण खुर्चीवर आणि लाडकी बहिण जमिनीवर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक हे घोषणाबाजी देत होते आणि उपमहापौरांच्या भाषणा दरम्यान गोंधळ निर्माण करण्याचा डाव रचणाऱ्या उबाठाचा डावच काँग्रेसने उधळवून लावला. त्यामुळे उबाठाला सभागृहात विरोधक आक्रमक झाल्याचे चित्रच निर्माण करता न आल्यामुळे अखेर उपमहापौरपदाच्या भाषणादरम्यान त्यांनी सभात्याग केला. त्यानंतरही काँग्रेसचे नगरसेवक घोषणा देत राहिले.


विशेष म्हणजे काँग्रेसने, शिवसेनेला प्रमुख विरोधक होवू न देता प्रमुख विरोधक आपण आहोत हे दाखवण्यासाठी ते उशिरा सभागृहात दाखल झाले आणि बसायला जागा नाही या मुद्दयावरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुरुवातीपासूनच काँग्रेसने उबाठाला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून न स्वीकारता आपणच विरोधी पक्ष आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत विरोधी पक्षाची प्रतिमा आणि त्यांचा विरोध झाकोळण्याचा प्रयत्न केला.

Comments
Add Comment

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका

Rustomjee Crown Unauthorized Construction : प्रभादेवीतील 'रुस्तमजी क्राउन’ इमारतीतील अनधिकृत बाधकामांवर महापालिकेचा हातोडा

- दोन दिवसांमध्ये १० सदनिकांच्या वाढीव बांधकामावर कारवाई - तब्बल १२८ सदनिका धारकांना नोटीस ; तब्बल महिनाभर सुरू