शिवसेनेचे चाणक्य... राहुल शेवाळे आणि अमेय घोलेंकडून उबाठासह एमआयएमचा गेम

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना महायुतीने एकत्रपणे गट तयार करण्याची रणनिती सुरु असतानाच शिवसेनेने भाजपसोबत एकत्रपणे गटनोंदणी न करता स्वतंत्रपणे नोंदणी करतानाच सभागृहातील एक स्वीकृत नगरसेवक आणि समित्यांमधील एक सदस्य संख्या वाढवून घेतली. शिवसेनेने भाजपसोबतच्या गटनोंदणीची प्रक्रिया न मानता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा करिष्मा दाखवला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह शिवसेनेने एकत्रपणे गटनोंदणी केल्याचे प्रमाणपत्रच महापालिकेला प्राप्त केले आहे. यामुळे सभागृहातील एमआयएमचा एक वाढला जाणारा स्वीकृत नगरसेवक कमी होत असून तो शिवसेनेच्या वाट्याला जात आहे. तसेच समित्यांमध्येही शिवसेनेचाही एक सदस्य वाढत आहे. अर्थात शिवसेनेने हा करिष्मा केला आहे तो माजी खासदार राहुल शेवाळे आणि गटनेते अमेय घोले यांच्या चाणक्यनितीने. महापालिकेत शिवसेनेसाठी हे दोन्ही नेते चाणक्य ठरलेले पहायला मिळत आहे.


मुंबई महापालिकेत भाजपचे ८९ आणि शिवसेनेचे २९ नगरसेवक निवडून आल्यानंतर सभागृहांमध्ये भाजपच्या वाट्याला ४, उबाठाच्या वाट्याला ३, शिवसेनेच्या वाट्याला १, काँग्रेसच्या वाट्याला १ आणि एमआयएमच्या वाट्याला १ अशाप्रकारे स्वीकृत नगरसेवकांचा कोटा होता. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चा एक अशाप्रकारे चारही नगरसेवकांना आपल्या गळाला लावून त्यांचा पाठिंबा शिवसेनेने मिळवला आणि आता त्यांना आपल्या गटात सामील करत आपला कोटाही वाढवला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिवसेनेने आपला गट बनवल्यामुळे महापालिका सभागृहातील शिवसेनेचा कोटा वाढला आणि जिथे त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक जाणार होता, तिथे आता त्यांचे दोन सदस्य जाणार आहेत. हा स्वीकृत नगरसेवक एमआयएमचा होणार होता, तो आता शिवसेनेच्या वाट्याला येणार आहे.


एवढेच नाही तर स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती तसेच बेस्ट समितीसह विशेष समित्यांमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या एकने वाढली आहे. मात्र, ही संख्या वाढल्यामुळे उबाठाची सदस्य संख्या एकनेही कमी होत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांमध्ये एमआयएमच्या वाट्याला जाणारा एक नगरसेवक आणि समित्यांमध्ये उबाठाचा प्रत्येक एक सदस्य कमी करण्याची रणनिती शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि त्यांचे गटनेते अमेय घोले यांनी आखली होती. त्याला अखेर यश आले असून दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांचा एकत्रपणे शिवसेनेसोबत गटनोंदणीचे पत्रच कोकण विभागीय आयुक्तांकडून महापालिका सचिवांना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे अखेर यावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे शिवसेनेचे सभागृहात दोन स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत. तर समित्यांमध्ये एक सदस्य वाढला जाणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कुणाची वर्णी लावून समित्यांमधील सदस्य शिवसेना आपल्याकडे घेते का? की स्वीकृत नगरसेवक आपल्याकडे घेवून समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सामावून घेतले जाते का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Comments
Add Comment

Iran Israel War : युद्धाच्या सावटाखालील मराठी नागरिकांसाठी मुख्यमंत्री मदतीला धावले; विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन जारी

परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावास अलर्ट मोडवर मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर,

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

इराणच्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू, चौघांची ओळख पटली

वॉशिंग्टन डीसी : इराणने रविवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात अमेरिकेच्या सहा सैनिकांचा मृत्यू झाला. यापैकी चार

Israel - Iran War : अमेरिकेचा इराणवर सागरी हल्ला; १७ इराणी जहाजे नष्ट केल्याचा अमेरिकेचा दावा

मध्य-पूर्वेतील महायुद्ध आता जमिनीवरून समुद्रात पोहोचलं आहे. अमेरिकेने इराणला आजवरचा सर्वात मोठा धक्का दिला आहे.

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला