एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून घ्या, एप्रिल महिण्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होत आहे आणि त्याचसोबत बँकांनी आपल्या सुट्ट्यांची यादी देखील जाहीर केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या आयडीनुसार, पुढील महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत, ज्यामध्ये रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार तसेच काही सण आणि विशेष प्रसंगाचा समावेश आहे.



एप्रिल महिन्यात किती दिवस राहतील बँक बंद पहा ही यादी...


१ एप्रिल (बुधवार): वार्षिक बंदमुळे देशभरातील बँका बंद राहतील.
२ एप्रिल (गुरुवार): मौंडी थर्सडे निमित्त कोची आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील.
३ एप्रिल (शुक्रवार): गुड फ्रायडे निमित्त देशभरात बँकांना सुट्टी असेल.
५ एप्रिल (रविवार): सर्व बँकांना साप्ताहिक रविवारची सुट्टी असेल.
११ एप्रिल (शनिवार): महिन्यातील दुसऱ्या शनिवारची सुट्टी असेल.
१२ एप्रिल (रविवार): सर्व बँका रविवारी बंद राहतील.
१४ एप्रिल (मंगळवार): डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती/महाविषुव संक्रांती/बिजू/बुईसू उत्सव/तमिळ नववर्ष दिन/बोहाग बिहू/चिराओबा/बैसाखी निमित्त देशभरातील विविध राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
१५ एप्रिल (बुधवार): बंगाली नववर्ष दिन (नबवर्षा)/बोहाग बिहू/विशू/हिमाचल दिन – आगरतळा, गुवाहाटी, इटानगर, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुवनंतपुरम येथील बँका बंद राहतील.
१६ एप्रिल (गुरुवार): बोहाग बिहू निमित्त गुवाहाटीतील बँका बंद राहतील.
१९ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
२० एप्रिल (सोमवार): बसव जयंती/अक्षय तृतीयेनिमित्त बंगळूरसह अनेक राज्यांतील बँका बंद राहतील.
२१ एप्रिल (मंगळवार): गारिया पूजेनिमित्त आगरतळा येथील बँका बंद राहतील.
२५ एप्रिल (शनिवार): महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
२६ एप्रिल (रविवार): देशभरातील सर्व बँकांना रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.


बँका जरी बंद असल्या तरी युपीआय सेवा ही आपल्या हातात म्हणजेच आपल्या फोन मध्ये कायम उपलब्ध तर आहेच. त्यामुळे लक्षात ठेवा पुढील काही दिवस बँकवर अवलंबून न राहता आपला युपीआय सिस्टीम अपडेट करा.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी सहकुटुंब ओढला श्रीजगन्नाथांचा रथ

मुंबई : भगवान श्रीजगन्नाथांच्या पवित्र रथयात्रेचे औचित्य साधून इस्कॉन, जुहू येथे आयोजित करण्यात आलेल्या ४५ व्या

BMC News : रुग्ण बनून सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष पोहोचले रात्री १२ वाजता केईएम रुग्णालयात

रुग्णालयातील परिस्थिती पाहून झाले हैराण अधिष्ठाता यांना दिले उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुंबई : मुंबई

Mumbai Rain Update : IMDचा इशारा! मुंबईसह ११ जिल्ह्यांना पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट!

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) आज, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी नाऊकास्ट (Nowcast) इशारा जारी केला आहे. पुढील ३

Devendra Fadnavis : देवा भाऊंच्या वाढदिवसानिमित लाडक्या बहिणींच्या आरोग्याची तपासणी

मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये स्तन कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन वैद्यकीय क्षेत्रातील २ हजारांहून अधिक

Mumbai Trees : मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा

वृक्षतज्ज्ञ व अभ्यासक यांच्या समवेत प्रशासनाची सखोल चर्चा मुुंबई : मुंबईत विविध कारणांनी होणाऱ्या

Ritu Tawde : महापौरांकडून तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचे कौतुक

मुंबईत हॉटेल्स,डेरीसह इतर खानपान सेवांची भेसळीच्या अनुषंगाने होणार तपासणी मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त