आयर्लंडची दाणादाण, ऑस्ट्रेलिया ६७ धावांनी विजयी

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये आयर्लंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने ६७ धावांनी जिंकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिस, रेनशॉ, जोश इंग्लिस यांनी अचूक टप्प्यांवर भेदक गोलंदाजी केली. यामुळे आयर्लंडचा डाव १६.५ षटकांत ११५ धावांत आटोपला. नॅथन एलिसने १२ धावा देत चार बळी घेतले. तर ॲडम झम्पाने २३ धावा देत चार बळी घेतले. याआधी ऑस्ट्रेलियाने २० षटकांत सहा बाद १८२ धावा केल्या. स्टॉइनिसने ४५ तर इंग्लिसने ३७ धावांचे योगदान दिले.

कर्णधार मिचेल मार्शच्या गैरहजेरीत ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली आणि आयर्लंड विरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून मार्कस स्टोईनिसने २९ चेंडूत ४५, जोश इंग्लिसने १७ चेंडूत ३७, मॅट रेनशॉने ३३ चेंडूत ३७ धावांचे योगदान दिले.

धावांचा पाठलाग करताना आयर्लंडचा कर्णधार पॉल स्टर्लिंग पहिल्याच चेंडूवर ‌’रिटायर्ड हर्ट‌’ झाला. नंतर नॅथन एलिसने आपल्या भेदक माऱ्याने आयर्लंडला सावरण्याची संधीच दिली नाही. त्याने पॉवरप्लेमध्येच तीन बळी घेत आयर्लंडला लागापाठ धक्के दिले. हॅरी टेक्टर (०) आणि रॉस ॲडायर (१२) लवकर परतले. नॅथन एलिस आणि ॲडम झम्पाने भराभर आयर्लंडचे फलंदाज बाद केले. यामुळे शेवटपर्यंतला आयर्लंडला डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही.
Comments
Add Comment

India vs Sri Lanka : कोलंबो कसोटीत पावसाच्या व्यत्ययाचा भारताला फटका, श्रीलंकेची १६ धावांची आघाडी; पाचव्या दिवशी रंगणार निर्णायक लढत

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात पावसाने पुन्हा एकदा व्यत्यय आणला. त्यामुळे चौथ्या

WCL Season 3 : डब्ल्यूसीएलचा तिसरा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत होणार

नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स (डब्ल्यूसीएल) आपल्या बहुप्रतिक्षित तिसऱ्या हंगामासह परत येण्यास

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)