T20 World Cup 2026 NZ vs UAE: यूएईला धूळ चारत न्यूझीलंडचा एकतर्फी विजय

चेन्नई: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला आहे. आज म्हणजेच मंगळवार १० फेब्रुवारी रोजी या स्पर्धेतील अकरावा सामना खेळला गेला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध यूएई असा सामना रंगला. या सामन्यात युएईला धूळ चारत न्यूझीलंडचा एकतर्फी विजय झाला आहे.



असा रंगला सामना:


न्यूझीलंड विरुद्ध यूएई या सामन्यान नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना UAE च्या संघाने अवघ्या १२ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर अलीशान शराफू आणि कर्णधार मुहम्मद वसीमची जोडी चांगली खेळली. या दोघांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर UAE च्या संघाने ६ विकेट्सच्या बदल्यात १७३ धावा केल्या. ही UAE ची टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली.


अलीशान शराफू शेवटपर्यंत टिकला असता तर UAE च्यासंघाने या सामन्यात २०० धावांचा आकडाही गाठला असता. पण मार्क चॅपमन आणि डॅरिल मिचेल या दोघांनी सीमारेषेवर कमालीचा ताळमेळ दाखवत त्याची कॅच पकडली.





मुहम्मद वसीमचं नाबाद अर्धशतक: 


अलीशान शराफू याने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. तो माघारी फिरल्यावर कर्णधार मुहम्मद वसीम याने ४५ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटाकरांच्या मदतीने नाबाद ६६ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १७३ धावा लावल्या. न्यूझीलंडच्या संघाकडून मॅट हेन्रीनं सर्वाधिक २ तर जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.





न्यूझीलंडचा एकतर्फी विजय:


कहर म्हणजे न्यूझीलंड संघाने १७४ धावांचे लक्ष २८ चेंडू आणि १० विकेट्स शिल्लक ठेऊन गाठले. न्यूझीलंडचा हा एकतर्फी विजय ऐतिहासिक ठरला. टिम सेफर्टने ४२ चेंडूत ८९ धावांची धमाकेदार खेळी केली. या डावात त्याने १२ चौकार आणि तीन षटकार मारले. दरम्यान, फिन अॅलनही ५० चेंडूत ८४ धावा केल्या. त्याने त्याच्या धमाकेदार खेळीत पाच चौकार आणि पाच षटकारही मारले. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात विकेट्सच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा विजय आहे.


न्यूझीलंडपूर्वी पाच संघांनी टी-२० विश्वचषकात १० विकेट्सने विजय मिळवला. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडचा हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासह, न्यूझीलंडने ग्रुप डी पॉइंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. किवींचा पुढील सामना १४ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Comments
Add Comment

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य

Neeraj Chopra : नीरज चोप्रा या महिन्यात लॉझेन डायमंड लीगमध्ये उतरणार

लॉझेन : भारताचा स्टार भालाफेकपटू, माजी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियन नीरज चोप्रा २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या लॉझेन