Mumbai Climate Week: देशातील पहिल्या क्लायमेट वीकचे मुंबईत आयोजन

बिल गेट्स, सचिन तेंडुलकर, हिलरी क्लिंटन, नोएल टाटा, नादिर गोदरेज, रोहिणी निलेकणी यांची उपस्थिती


मुंबई: मुंबईत पहिल्यांदाच १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्लू) चे आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान मुंबई हे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्वाचे प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे. या काळात भारत आणि जगभरातील सरकारप्रमुख, उद्योगजगतातील नेते, हवामान क्षेत्रातील नवोन्मेषक, दानशूर संस्था, युवक तसेच स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी एकत्र येऊन हवामान विषयक चर्चेपासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करतील.


मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे असलेल्या मध्यवर्ती केंद्रामार्फत करण्यात येणार असून, त्याचबरोबर शहरभर विविध शैक्षणिक संस्था, वसाहती आणि सांस्कृतिक ठिकाणी कार्यक्रमांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या उपक्रमांमधून प्रत्यक्ष अंमलात आणता येतील अशा हवामान उपाययोजनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.


हवामानावरील ही जागतिक पातळीवरील चर्चा पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था प्रोजेक्ट मुंबई यांच्या नेतृत्वाखाली होत असून, महाराष्ट्र शासन, पर्यावरण व हवामान बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे या सप्ताहास सहकार्य लाभले आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची ‘लाईव्ह टेस्ट बेड’ म्हणून स्थान दिले जात आहे.


मुंबई क्लायमेट वीकविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई क्लायमेट वीकद्वारे हवामान बदलावर कृती करण्याचा भारताचा ठाम निर्धार शहर पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत अधोरेखित होतो. भारत आणि जगभरातील सरकारे, उद्योग, वित्तसंस्था, तज्ज्ञ आणि युवक मुंबईत एकत्र येत असताना, महाराष्ट्र आपल्या नागरिकांसाठी आणि ग्लोबल साऊथमधील देशांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी सर्व भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे, असा स्पष्ट संदेश यातून दिला जात आहे.”


प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शिशिर जोशी म्हणाले, “मुंबई ही नेहमीच जिद्द आणि कल्पकतेसाठी ओळखली जाणारी नगरी आहे आणि मुंबई क्लायमेट वीकमध्ये हीच ऊर्जा हवामान संकटाशी मोठ्या प्रमाणावर भिडताना दिसेल. ही भारतातील पहिली अशा स्तरावरील नागरिकांच्या नेतृत्वाखालील हवामान चळवळ आहे, जिथे मंत्री, उद्योगजगतातील नेते आणि तज्ज्ञ हे विद्यार्थी, प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील स्वयंसेवक यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर सहभागी होतील. यामुळे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्व प्रत्यक्षात कसे असते, हे मुंबई दाखवून देईल.”



जागतिक व राष्ट्रीय नेतृत्व


मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान धोरण, वित्त, उद्योग आणि नागरी समाजातील आंतरराष्ट्रीय व भारतीय नेतृत्व सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय वक्त्यांमध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, रॉकीफेलर फाउंडेशनचे प्रतिनिधी राजीव शाह, आयएफसी (वर्ल्ड बँक समूह) दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक इमाद फखुरी, एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंडच्या कार्यकारी संचालक अमांडा लेलँड आणि अलाइड क्लायमेट पार्टनर्सच्या वरिष्ठ सल्लागार क्लॅरिसा डी फ्रँको यांचा समावेश आहे.


भारतीय सार्वजनिक क्षेत्रातून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहर आणि प्रादेशिक नेतृत्वाचाही सहभाग असणार आहे.


उद्योग व वित्त क्षेत्रातून अमित चंद्रा (बेन कॅपिटल), अंकुर गुप्ता (ब्रुकफिल्ड), व्ही. वैद्यनाथन (आयडीएफसी बँक), जामशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अंजली रवीकुमार (झोमॅटो), प्रतीक अग्रवाल (सेरेंटिका रिन्युएबल्स) आणि समीर सिसोदिया (रेनमॅटर फाउंडेशन) सहभागी होणार आहेत.


पर्यावरण विषयासाठी काम करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील व्यक्तींमध्ये दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर यांचा सहभाग असेल.

Comments
Add Comment

BMC : महापालिकेला अखेर आठवले दुषित पाणी आणि गळती

- पाणी गळती शोधून काढण्यासाठी पथके तैनात करण्याचेही बांगरांनी दिले आदेश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

BMC : मुंबईतील ओसी नसलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा

- महापालिकेच्यावतीने राबवण्यात येणार अभय योजना - सन १७ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या इमारतींना मिळणार लाभ सचिन

पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या ब्रिटीशकालिन पर्जन्य जलवाहिन्यांचे ५० वर्षांनी वाढणार आयुष्य

मुंबई: मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई शहर विभागातील १०० वर्षे जुन्या भूमिगत कमानी पर्जन्य जलवाहिन्यांचे

Kishori Pednekar: विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या पेडणेकर आधीच पोहोचल्या नाल्याच्या काठावर

मुंबई: मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षांत सत्तेवर असताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाही तर जुनच्या

प्रकल्पबाधितांच्या सदनिका वाटपाची प्रक्रिया सुलभ करा; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले मालमत्ता विभागाला निर्देश

मुंबई: मुंबईतील सदनिकांची वाढती मागणी लक्षात घेता, प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी (पी ए पी) सदनिका उपलब्ध करून

Ashwini Bhide: गारगाईसह समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाला गती द्या; महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे जलखात्याला आदेश

मुंबई: समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी महानगरपालिकेने हाती घेतलेल्या २०० दशलक्ष लीटर प्रतिदिन क्षमतेच्या ४००