कोस्टल रोडवर ऐकू येणार जय हो

मार्गिकेवर विशेष संगीत पट्ट्यांमुळे वाहनचालकांना अनोखा अनुभव


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : वाहतूक कोंडी विरहित, वेगवान आणि सुखकर प्रवासाची साक्ष ठरलेल्या मुंबईतील धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावर (मुंबई कोस्टल रोड) वाहनचालकांसाठी एक आगळावेगळा आणि अभिमानाचा अनुभव देणारी अभिनव संगीत संकल्पना प्रत्यक्षात आली आहे. या रस्त्यावर विशेष तंत्रज्ञानयुक्त संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या संगीत मार्गावरील (मेलोडी रोड) पट्ट्यांवरून वाहन गेल्यावर स्लमडॉग मिलेनियर चित्रपटातील ‘जय हो’ हे गाणे ऐकू येणार आहे. हा जगातील पाचवा आणि भारतातील पहिलाच प्रयोग आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे.


मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या मुंबई किनारी रस्त्यावर नरिमन पॉईंट कडून वरळीकडे जाणाऱ्या उत्तरमार्गिकेवर हा अभिनव प्रयोग साकारण्यात आला आहे. वरळीकडे जाणाऱ्या भूमिगत बोगद्यातून बाहेर पडल्यानंतर दुभाजकाला लागून असलेल्या पहिल्या मार्गिकेवरून ५०० मीटर पुढे संगीत पट्टे बसविण्यात आले आहेत. या पट्ट्यांवरून ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहन नेल्यास "जय हो" या गीताची धून वाहनात बसून ऐकू येते. रस्त्याच्या पृष्ठभागावर ठराविक अंतरावर आणि विशिष्ट आकारात पट्टे बसविण्यात आले आहेत. वाहन ठराविक वेगात या पट्ट्यांवरून गेल्यावर चाकांच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरींवर ‘जय हो’ गाण्याची धून बसविण्यात आली आहे. हा अनुभव वाहनाच्या आत बसलेल्या प्रवाशांना स्पष्टपणे जाणवणार आहे. भूमिगत बोगद्यात वाहन असतानाच चालकांना संगीतमार्गाची माहिती व्हावी यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून ५०० मीटर, १०० मीटर आणि ६० मीटर अंतर आधीच संगीत मार्गाबाबतचे सूचनाफलक लावण्यात आले आहेत.


असा आहे ‘संगीत‘/मेलडी रोड’


रस्त्यावर ठराविक अंतरावर व विशिष्ट मोजमापात खोबणी किंवा पट्टे तयार केले आहेत. वाहन ठराविक वेगात त्या पट्ट्यांवरून गेले, की चाकांच्या घर्षणातून संगीतासारखा ध्वनी निर्माण होतो. यालाच ‘म्युझिकल रोड’ किंवा ‘मेलडी रोड’ असे म्हटले जाते.


भारतातील पहिलाच प्रयोग


या अभिनव संकल्पनेचा प्रसार सन २००७ मध्ये जपानमध्ये झाला. जपानमधील अभियंता शिझुओ शिनोडा यांनी बुलडोझरच्या साहाय्याने रस्त्यावर काम करत असताना हा ध्वनी परिणाम शोधून काढला. पुढे याच प्रयोगातून ‘मेलडी रोड’ ही संकल्पना विकसित झाली. आतापर्यंत हंगेरी, जपान, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमिराती येथे असे प्रयोग करण्यात आले आहेत. भारतातील हा पहिलाच प्रयोग आहे.

Comments
Add Comment

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून

Matunga Fire : माटुंगा वर्कशॉपमध्ये ट्रेनच्या डब्यांना भीषण आग; धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : मुंबईतील माटुंगा रेल्वे वर्कशॉप येथे आज म्हणजेच मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी उभ्या असलेल्या ट्रेनच्या

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :