राज्यभर अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा, अपघात रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे कडक निर्देश

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट शब्दांत सूचित केले.अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे.


३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे तब्बल ३२ तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर भाष्य करताना मंत्री सरनाईक म्हणाले, “चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.”



वाहनांच्या तांत्रिक तपासणीला वेग, पारदर्शकतेवर भर


राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने व्हावी, असे निर्देश देण्यात आले. विशेषतः फॉर्म 138/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला. काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.



‘ब्लॅक स्पॉट’वर विशेष लक्ष


महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे—या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचे आदेश देण्यात आले.



अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सविस्तर अहवाल


महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.अपघाताची वेदना अजून ताजी असताना शासनाने घेतलेली ही धडक भूमिका म्हणजे केवळ प्रशासकीय हालचाल नाही, तर प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी उचललेले ठोस पाऊल आहे. नियम, नियंत्रण आणि जागरूकता या त्रिसूत्रीवरच सुरक्षित प्रवासाचा पाया उभा राहणार, असा स्पष्ट संदेश या बैठकीतून देण्यात आला.

Comments
Add Comment

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

Major decision by MHADA : उमरखाडीतील १,९२८ रहिवाशांना मिळणार ५०० चौरस फुटांची हक्काची घरे!

मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर, रोमँटिक अंदाजात माफी मागणं पडलं महागात, पुढे घडलं असं काही की...

Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण