Nitesh Rane: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाचा १०० टक्के निधी खर्च करून नियोजित विकासकामे पूर्ण करा

मुंबई: मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या अखर्चित निधीचा विनियोग करून नियोजित विकासकामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.


विकासासाठी मिळालेला एकही रुपया अखर्चित राहता कामा नये, लोकाभिमुख कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गतीने हालचाली कराव्यात, तसेच अतिरिक्त निधीसाठी लागणारा आवश्यक पाठपुरावा शासन स्तरावर तातडीने केला जाईल.असे बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.


विभागाला प्राप्त झालेला निधी अखर्चित न ठेवता तो १०० टक्के खर्च करून मच्छिमार बांधवांच्या हिताच्या आणि बंदरांच्या विकासाच्या योजना मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.


आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात विभागाकडील उपलब्ध निधीचा शंभर टक्के वापर करून सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.


राज्याच्या किनारपट्टीचा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील आधुनिकतेसाठी आगामी काळात अधिक निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देश यावेळी मंत्री राणे यांनी दिले.


निधीचा उपयोग प्रामुख्याने मच्छिमारांच्या मूलभूत सुविधा आणि बंदरांच्या सक्षमीकरणासाठी करण्यावर भर देण्यात आला.


या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, पदुम (पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय) विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यासह विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

इस्रायलमधील मोठ्या केमिकल फॅक्टरीवर इराणचा हल्ला

तेल अविव : इराणने (Iran) बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने (Ballistic missile) इस्रायलच्या (Israel) एका प्रमुख रासायनिक कारखान्यावर अर्थात

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद