अजित पवारांच्या निधनामुळे भाजपने विजयाचा जल्लोष टाळला

मुंबई : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने विजयाचा कोणताही जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली.


भाजप प्रदेश मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक निवडणुकीसाठी अहोरात्र मेहनत घेत घेतात. मात्र, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या प्रचारसभा न घेण्याचे आणि शांत, संघटनात्मक पातळीवर निवडणूक लढवण्याचे आदेश दिले होते. या संवेदनशील निर्णयाचा सर्व कार्यकर्त्यांनी आदर केला असून, निवडणूक निकालांनी ही कार्यपद्धती जनतेला मान्य असल्याचे सिद्ध केले आहे, असे चव्हाण म्हणाले.


रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कष्टकरी तसेच शहरी व ग्रामीण भागातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवण्यात आल्या. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षांत जे प्रभावी काम केले, त्याचीच ही फलश्रुती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



८० टक्क्यांहून अधिक सदस्य महायुतीचे


- कोरोना काळानंतर या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. १२ जिल्हा परिषदांवर महायुतीची सत्ता स्थापन होईल, असे चित्र दिसत आहे. तसेच १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे एकत्रित निकाल पाहता, ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येताना दिसत असून, हा जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे, असे ते म्हणाले.


- कोकणातील निकालांवर भाष्य करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, गेल्या काही निवडणुकांचे निकाल पाहता कोकण महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा असून, या विश्वासाबद्दल सर्व मतदारांचे त्यांनी आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

Nashik : श्रावणातील 'फेरी'चे सूक्ष्म नियोजन करा, सुरक्षिततेसोबत पाणी-वीज आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निर्देश

Nashik : श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेला

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील २४ तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा; गारपिटीचीही शक्यता

मुंबई : राज्यात सध्या काही भागांत पावसाची हजेरी सुरू असली, तरी अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप दमदार पावसाची

Pakistan High Commission in Delhi : दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई; बॅरिकेड्स आणि ट्रॅफिक बोलार्ड्स हटवले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगाबाहेर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे आणि रांगेचे

Free School Bag : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर; राज्य सरकारकडून १७४ कोटींच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिक्षण घेणाऱ्या

Western Railway Food and Water Safety : पश्चिम रेल्वेची अन्न आणि पाणी सुरक्षेसाठी कडक तपासणी; 98 टक्के अन्न नमुने, तर 99.87 टक्के पाणी नमुने सुरक्षित

मुंबई : प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न तसेच स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने

Free Online Coaching for Competitive Exams : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून आढावा

नवी दिल्ली : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या देशभरातील तरुणांना मोफत ऑनलाइन कोचिंग उपलब्ध करून देण्याच्या