Rajya Sabha : राज्यसभेतही पेपरफुटीविरोधी विधेयक मंजूर; दोषींना १० वर्षांपर्यंत तुरुंगवास, ₹१० कोटी दंडाची तरतूद

लोकसभेनंतर राज्यसभेतही आवाजी मतदानाने मंजुरी; एआयद्वारे फसवणूक, सायबर हॅकिंग आणि संघटित पेपरफुटीवरही कठोर कारवाई


दिल्ली: लोकसभेनंतर राज्यसभेनेही पेपरफुटीविरोधी (Paper Leak) विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले आहे. या विधेयकामुळे परीक्षा प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. विधेयकात पेपरफुटी, संघटित फसवणूक, सायबर हॅकिंग आणि एआयचा वापर करून परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. (Rajy Sabha)



या विधेयकानुसार, संघटित पद्धतीने पेपरफुटी करणाऱ्या किंवा फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या आरोपींना कमाल १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच दोषींवर १० कोटी रुपयांपर्यंत दंड आकारण्याचीही तरतूद करण्यात आली आहे. पेपरफुटीमुळे फेरपरीक्षा घ्यावी लागल्यास त्याचा संपूर्ण खर्चही दोषींकडून वसूल केला जाईल. (Exam Paper Leak)


याशिवाय, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून परीक्षा प्रक्रियेत फसवणूक करणे, ऑनलाइन प्रश्नपत्रिका प्रसारित करणे, परीक्षा प्रणाली हॅक करणे आणि इतर सायबर गैरप्रकारही या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. परीक्षा घेणारी संस्था, सेवा प्रदाता, तंत्रज्ञान कंपनी किंवा संबंधित अधिकारी यांचा गैरप्रकारात सहभाग आढळल्यास त्यांच्याविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (India Parliment)


दरम्यान, भाजप नेते तरुण चुघ यांनी या विधेयकाचे स्वागत करत, विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे म्हटले. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जलदगती न्यायालये, कठोर शिक्षा आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Exam Paper Leak)


या विधेयकामुळे देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ( Anti Paper Leak Bill)

Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी