रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६ मध्ये सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होऊन गेल्या. त्यानंतर १९९४- ९५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अॅड. निर्मला सामंत प्रभावळकर या दुसऱ्या महापौर झाल्या होत्या. त्यानंतर मात्र सन १९९७ -९८ पासून ते २०२२ या कालावधीत तत्कालीन शिवसेनेच्या अखंड सलग पाच महिला महापौर झाल्या आहेत.


मात्र यावेळी २०२६ मध्ये महापौर पदासाठी खुला वर्ग महिला आरक्षण असल्याने भाजपच्यावतीने रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवार म्हणून घोषित करून त्यांनी शनिवारी आपला अर्ज सादर केला आहे. प्रतिस्पर्धी पक्षाकडून अर्ज दाखल न झाल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. आता केवळ निवडणुकीची औपचारिकता शिल्लक असून बुधवारी त्यांना महापौर म्हणून पिठासीन अधिकारी घोषित करणार आहेत.


मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर पद हे मोठे प्रतिष्ठेचे पद आहे. मुंबईच्या महापौरांना विशेष मोठे अधिकार नाहीत. मात्र महापौर पद हे महत्वाचे आहे. मुंबईत देशाच्या राष्ट्रपतींचे आगमन झाल्यास राजशिष्टाचारानुसार मुंबईच्या महापौरांना त्यांचे स्वागत करण्याचा पहिला मान दिला जातो. महापालिकेत महापौरांना काही मर्यादित अधिकार असल्याने त्या आर्थिक बाबींशी संबंधित प्रस्तावांना मान्यता देऊ शकतात. त्यांना महापौर निधीतून वैद्यकीय उपचारासाठी गरजू लोकांना आर्थिक मदत करू शकतात. महापौर शिक्षक पुरस्कारासाठी आदर्श शिक्षकांच्या नावांची शिफारस करू शकतात. आणखीन काही मर्यादित स्वरूपाचे अधिकार महापौरांना आहेत. त्यामुळे महापौर पद हे प्रतिष्ठेचे आहे. मुंबई महापालिकेत १९९७ पासून सलग २६ वर्षे तत्कालीन शिवसेनेचे महापौर होते. विशेष म्हणजे १९५५ पासून ते आजपर्यंत मुंबईत ज्या सात महिला महापौर झाल्या आहेत, त्यामध्ये तत्कालीन शिवसेनेच्या पाच महिला महापौरांचा समावेश आहे.



मुंबई महापालिकेतील महिला महापौर


१९५५ -१९ ५६ : सुलोचना मोदी


१९९४ - १९९५ :ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर


१९९७ -१९ ९८ : विशाखा राऊत


२००७ -२० ०९ : डॉ. शुभा राऊळ


२००९ - २०१२ : श्रद्धा जाधव


२०१४ - २०१७ : स्नेहल आंबेकर


२०१९ -२० २२ : किशोरी पेडणेकर

Comments
Add Comment

Central Railway : मुंबईची लाईफलाईन देणार गुड न्यूज! मध्य रेल्वेवर स्वातंत्र्यदिनापासून 15 डब्यांच्या आणखी 22 लोकल धावणार

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाढती गर्दी कमी करण्यासाठी आणखी 22 उपनगरीय लोकल गाड्यांचे 12 डब्यांवरून 15

Government Officers : बदलीनंतरही शासकीय घर न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांचा भत्ता रोखणार

- राज्य सरकारचा निर्णय; नवीन नियमावली तात्काळ प्रभावाने लागू मुंबई : बृहन्मुंबई किंवा इतर जिल्ह्यांतून बदली

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत

Lok Adalat : राज्यात १ सप्टेंबरपासून 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत', महसूलमंत्र्यांची घोषणा; पुणे पॅटर्नच्या यशांनंतर राज्यव्यापी अंमलबजावणी

मुंबई : राज्यातील मंडळ अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये

FDA raids Parle Agro : 'पार्ले अ‍ॅग्रो'च्या गोदामांवर 'एफडीए'ची धाड, मुदत संपलेली उत्पादने जप्त; फ्रुटी आणि 'अ‍ॅपे फिज'चा समावेश

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चेंबूर परि