IND vs USA T20 : भारतीय संघाचं टेन्शन संपलं, पहिल्या विजयानंतर काय म्हणाला कॅप्टन सूर्यकुमार यादव?

मुंबई: टी- ट्वेंटी वर्ल्ड कपची सुरुवात शनिवारी पाकिस्तानच्या विजयाने झाली तर रात्री झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने युएसएविरुद्ध 29 धावांनी विजय नोंदवला अन् वर्ल्ड कपच्या विजयाचा नारळ फोडला आहे. परंतु वानखेडेवर झालेल्या या मॅचमध्ये टीम इंडियाची मोठी फजिती झाली होती. कॅप्टन सूर्यकुमार यादवने टीम इंडियाला सावरलं अन् मॅच जिंकवून दिली. अशातच मॅच संपल्यावर सूर्याने आनंदाची बातमी दिली आहे.


टॉस जिंकून युएसएने टीम इंडियाला जमिनीवर आणलं. भारताची अवस्था एका वेळी 77 धावांवर 6 विकेट्स अशी बिकट झाली होती. तिथून सूर्याने मॅच काढली अन् 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. त्यामुळे बॉलर्सला फाईट करायला संधी मिळाली अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मुंबईच्या आझाद मैदान आणि क्रॉस मैदान अशा मैदानांवर मी खूप क्रिकेट खेळलो असल्याने मला स्वतःवर पूर्ण विश्वास होता, असे सूर्याने सांगितले. यावेळी सूर्याने एका खेळाडूविषयी खुलासा केला.


कॅप्टन सूर्या वॉशिंग्टन सुंदरवर काय म्हणाला ?


 

खेळाडूंच्या इंज्युरी अपडेट देताना सूर्याने सांगितलं की, वॉशिंग्टन सुंदर आता फिट असून तो दिल्लीत टीमसोबत सामील होईल. जसप्रीत बुमराह आणि अभिषेक शर्मा यांना वातावरणातील बदलामुळे ताप आला होता. सध्या सर्व काही ठीक आहे. आता पुढच्या मॅचसाठी 5 दिवसांचा वेळ असून भारतीय संघ अधिक जोमाने मैदानात उतरेल, असा विश्वास कॅप्टन सूर्याने चाहत्यांना दिला.


दरम्यान वानखेडेची खेळपट्टी आज नेहमीपेक्षा थोडी वेगळी होती, असंही सूर्याने स्पष्ट केलं. सकाळी सूर्यप्रकाश कमी असल्याने पिच रोलिंग आणि पाणी देण्याच्या कामात मर्यादा आल्या असाव्यात, असं त्याने नमूद केलं. क्युरेटरने त्यांचे प्रयत्न केले असले तरी, निसर्गाच्या गोष्टी कोणाच्याच हातात नसतात, त्यामुळे आम्ही पिचचे कारण देऊन आमची खराब बॅटिंग लपवू शकत नाही, असंही सूर्याने प्रामाणिकपणे मान्य केलं आहे.


Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील