मंकी फिव्हरवर स्वदेशी लस विकसित, महाराष्ट्रातील दुर्गम भागातील नागरिकांना दिलासा

नवी दिल्ली : महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा यांसह संपूर्ण पश्चिम घाट पट्ट्यात दरवर्षी दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या 'कॅसानूर फॉरेस्ट डिसीज' अर्थात 'मंकी फिव्हर'वर भारतीय संशोधकांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने या गंभीर आजारावर पूर्णतः स्वदेशी बनावटीची, सुधारित आणि अधिक प्रभावी लस विकसित केली असून, या लसीच्या मानवी वैद्यकीय चाचणीच्या पहिल्या टप्प्याला आता अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. या संशोधनामुळे विशेषतः महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


काय आहे मंकी फिव्हर आणि त्याचा धोका?


कॅसानूर फॉरेस्ट डिसीज हा प्रामुख्याने 'टिक-बॉर्न' म्हणजेच गोचीडजन्य विषाणूमुळे होणारा आजार आहे. १९५७ मध्ये कर्नाटकच्या कॅसानूर जंगलात या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला होता, म्हणून याला ' केएफडी' असे नाव पडले. हा विषाणू प्रामुख्याने 'हेमाफिसालिस स्पिनिगेरा' या प्रकारच्या गोचिडांमार्फत पसरतो. हे गोचीड बाधित माकडे आणि उंदरांना चावल्यानंतर जेव्हा मानवाला चावतात, तेव्हा या विषाणूचा संसर्ग होतो. माकडांच्या मृत्यूशी या आजाराचा थेट संबंध असल्याने याला स्थानिक भाषेत 'मंकी फिव्हर' किंवा 'मंकी डिसीज' म्हटले जाते. या आजारात अचानक तीव्र ताप येणे, उलट्या, जुलाब आणि गंभीर प्रकरणांमध्ये शरीरातून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसतात. धक्कादायक बाब म्हणजे, बाधित रुग्णांपैकी ५ ते १० टक्के रुग्णांचा यात मृत्यू होतो आणि यावर अद्याप कोणताही ठोस औषधी उपचार उपलब्ध नाही.


महाराष्ट्रातील पश्चिम घाटासाठी 'कवच'


महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये काम करणारे वन कर्मचारी, शेतकरी आणि लाकूडतोडे यांना या आजाराचा सर्वाधिक धोका असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जानेवारी ते एप्रिल या काळात या आजाराचा प्रादुर्भाव शिखरावर असतो. या पार्श्वभूमीवर, आयसीएमआरच्या अखत्यारीतील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि भारतीय रोगप्रतिकारशास्त्र संस्था यांनी संयुक्तपणे ही 'अॅडज्युव्हांटेड इनएक्टिव्हेटेड' लस विकसित केली आहे. ही लस शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्षमपणे जागृत करण्यास मदत करते. ही दोन मात्रांची लस असून, २८ दिवसांच्या अंतराने तिचे दोन डोस दिले जातील.

Comments
Add Comment

Middle East War Beer Price Hike : आता 'चीअर्स' करणं पडणार महाग! मध्य-पूर्वेतील युद्धामुळे बियर महागणार ? वाचा सविस्तर

मध्य-पूर्वेतील वाढत्या लष्करी संघर्षामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे ढग दाटले असून, त्याचे गंभीर परिणाम आता सर्वच

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि

एस-400 मिसाइलसह संरक्षण उपकरणांच्या खरेदीस मंजुरी

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण मंत्रालयाने हवाई दलासाठी रशियाकडून एस-400 एअर डिफेन्स सिस्टमची अतिरिक्त बॅटरी खरेदी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्त्वात उच्चस्तरीय गटाची स्थापना

- पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या