महाराष्ट्र आणि गोव्याला पंधराव्या वित्त आयोगाच्या अनुदानाअंतर्गत ५९२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी प्राप्त

नवी दिल्ली : केंद्र सरकारने, पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी, महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठीचे मुक्त अनुदान मंजुर करून जारी केले आहे. पंचायत राज संस्था/स्थानिक स्वराज्य संस्था अधिक बळकट करण्यासाठी मंजूर झालेल्या या निधी अंतर्गत, महाराष्ट्राला पंधराव्या वित्त आयोगाच्या वित्त वर्ष २०२४ - २५ साठीच्या मुक्त अनुदानाच्या पहिल्या टप्याच्या राखून ठेवलेल्या निधीपोटी ७९.८२ कोटी रुपये मिळाले आहे. हा निधी, १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि २७ पात्र ग्रामपंचायतीसाठी मिळाला आहे.


त्याशिवाय, २०२४ - २५ साठी दुसऱ्या टप्प्याचे मुक्त अनुदान म्हणून, २२१.८२ कोटी रुपये, राखून ठेवलेला हिस्सा म्हणून मिळाले आहेत, जे, अतिरिक्त १२ जिल्हा पंचायती, १२५ तालुका पंचायती आणि ५२४९ ग्रामपंचायतीसाठी आहेत. वित्त वर्ष, २०२३ - २४ साठीचे बद्ध अनुदान (tied grants) देखील दिले आहे. यात, पंधराव्या वित्त आयोगाचा राखून ठेवलेला पहिला हप्ता, १५९.३२ कोटी रुपयांचा समावेश आहे. जो, १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि ११२० पात्र ग्रामपंचायतीसाठी मिळाला आहे. त्याशिवाय, दुसऱ्या हप्त्यातील राखून ठेवलेला ११८.६९ कोटी रुपयांचा निधी देखील जारी करण्यात आला असून तो १२ पात्र जिल्हा पंचायती, १२५ पात्र तालुका पंचायती आणि १८३ पात्र ग्रामपंचायतीसाठी खर्च केला जाणार आहे.


तर गोव्यासाठी, वित्त वर्ष २०२४ - २५ च्या मुक्त अनुदानाच्या पहिल्या हप्त्यापोटी, १२.४० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. हे २ पात्र जिल्हा पंचायती आणि सर्व १९१ पात्र ग्रामपंचायतीसाठी खर्च केले जाणार आहेत. केंद्र सरकारकडून, पंचायती राज मंत्रालय आणि जल शक्ती मंत्रालय (पेयजल व स्वच्छता विभाग) यांच्या माध्यमातून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पंधराव्या वित्त आयोगानुसार, अनुदानाची रक्कम राज्यांना देण्याची शिफारस केली जाते. हे अनुदान वित्त मंत्रालयाद्वारे राज्यांना वितरित केले जाते. एका आर्थिक वर्षात दोन हप्त्यांमध्ये हे अनुदान शिफारसी नुसार वितरित केले जाते.


मुक्त अनुदान पंचायती राज संस्था/ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या स्थानिक गरजांनुसार, संविधानाच्या अकराव्या अनुसूचीतील २९ विषयांअंतर्गत वापरू शकतात. मात्र, हे अनुदान पगार आणि इतर प्रशासकीय खर्चासाठी वापरता येत नाही.तर बद्ध अनुदान, अ) स्वच्छता आणि उघड्यावर शौचमुक्त गावाची स्थिती टिकवून ठेवणे, यामध्ये घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया, सांडपाणी आणि मैला व्यवस्थापनाचा समावेश असला पाहिजे . तर ब) पेयजल पुरवठा -यात पावसाचे पाणी साठवण आणि पाण्याचा पुनर्वापर असे प्रकल्प राबवले जातात.

Comments
Add Comment

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू